ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील ज्येष्ठ कॉमेडियन अभिनेते यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु, बॉलिवूडमधील ज्येष्ठ कॉमेडियन अभिनेते असरानी ज्यांचे अनेक डायलॉग्ज हिट झाले त्यांचे पूर्ण नाव माहीत आहे का, जाणून घ्या
असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ साली ब्रिटीश इंडियामधील जयपूर येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी आहे.
१९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियां' या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९७० च्या दशकात आज की ताजा खबर, रोटी, प्रेम नगर, चुपके चुपके, छोटी सी बात, रफू चक्कर, शोले, बालिका बधू, फकिरा, अनुरोध, छैल्ला बाबू, चरस, फांसी, दिल्लगी, हीरालाल पन्नालाल, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
एका मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात जन्मलेल्या असरानी यांनी सेंट झेवियर्स स्कूलमधून मॅट्रिक पूर्ण केले आणि जयपूरच्या राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
१९७३ मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केले. असरानी यांना एक मुलगा, नवीन असरानी, जो अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांना तीन भाऊ आणि चार बहिणी होत्या. ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्यांपैकी असरानी एक होते.