Oral Cancer saam tv
लाईफस्टाईल

Oral cancer: तंबाखूचं सेवन न करणाऱ्यांमध्येही तोंडाचा कॅन्सर वाढतोय, महिलांसाठी ही धोक्याची घंटा का ठरतेय?

तंबाखू न वापरणाऱ्यांमध्येही तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, विशेषतः महिलांमध्ये. एचपीव्ही संसर्ग, तोंडाची अस्वच्छता आणि जीवनशैली यामुळे धोका वाढतो. सुरुवातीची लक्षणं ओळखून वेळेत निदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तोंडाचा कर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर हा खरंतर तंबाखू सेवनाशी संबंधित मानला जातो. मात्र, आता या आजाराच्या स्वरूपात चिंताजनक बदल दिसून येतंय. विशेष म्हणजे तंबाखूचं सेवन न करणाऱ्यांमध्येही याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसतंय.

विशेषतः महिलांमध्ये या कॅन्सरच्या निदानाचं प्रमाण वाढलं आहे. तंबाखूचे सेवन न करणाऱ्यांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरचं वेळीच निदान करणं आव्हानात्मक ठरतं. कारण अनेक रुग्णांमध्ये या आजाराशी संबंधित सुरुवातीची लक्षणं दिसून येत नाहीत.

तंबाखू आणि मद्यपान ही तोंडाच्या कॅन्सरची प्रमुख कारणं असली तरी आता तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागे इतर घटकही जबाबदार ठरत आहेत. यामध्ये तोंडाची अस्वच्छता, एचपीव्ही (HPV) संसर्ग, आनुवंशिकता, पोषणातील कमतरता आणि वाढते प्रदूषण यास कारणीभूत ठरतंय.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डॉ. राम पाटील म्हणाले, तोंडाचा कॅन्सर अनेकदा कोणतीही लक्षणं नसताना विकसित होतो. त्यामुळे त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष केले जातं. यामध्ये तोंडातील बऱ्या न होणाऱ्या जखमा (अल्सर), अस्पष्ट गाठ, गिळताना त्रास होणं, आवाजात बदल किंवा तोंडात पांढरे/लाल चट्टे पडणं यांचा समावेश आहे.

अनेकदा रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि हा आजार पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर डॉक्टरांकडे उपचारांसाठी धाव घेतात. ज्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि परिणाम कमी अनुकूल ठरतात. तंबाखू न वापरणाऱ्यांमध्ये महिलांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. या रुग्णांमध्ये पारंपरिक जोखीम घटक नसल्यामुळे वेळीच निदान करणे आवाहनात्मक ठरते. त्यामुळे तोंडातील किरकोळ बदल, जखमांकडे दुर्लक्ष करू नका, असंही तज्ज्ञांनी सांगितलंय.

डॉ. राम पुढे सांगतात की, तंबाखू न वापरणाऱ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झालीये. महिलांमध्येही ही वाढ स्पष्टपणे दिसून येते. दर महिन्याला २५ ते ६५ वयोगटातील १० संशयित रुग्णांपैकी ४ रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगासह उपचाराकरिता येतात, त्यापैकी ३ महिला असतात, तर १ पुरुष असून त्यांनी पूर्वी कधीही तंबाखूचं सेवन केलेलं नसतं. हा बदल चिंताजनक असून अनेक रुग्णांमध्ये तोंडाची अस्वच्छता आणि एचपीव्ही (HPV) संसर्ग हे प्रमुख कारण ठरत आहेत.

वेळीच निदान केल्यास उपचार केल्यास रूग्णाचा जीव वाचवता येतो. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा समावेश असतो. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास हा कॅन्सर बरा होऊ शकतो. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती मेहता म्हणाल्या की, तंबाखू न वापरणाऱ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असून महिलांमध्ये हे प्रमाण वाढतंय. अशा रुग्णांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येतं. यामागच्या कारणांमध्ये तोंडाची अस्वच्छता, एचपीव्ही (HPV) संसर्ग, तुटलेल्या दातांमुळे होणारी दीर्घकालीन जळजळ, चुकीच्या मापातील दातांच्या सेट्स (डेंचर्स), तिखट आणि मसालेदार आहाराच्या सवयी आणि वाढता ताण यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT