Oppo Find N3 Flip Saam Tv
लाईफस्टाईल

Oppo Find N3 Flip : ओप्पोचा नवा स्टायलिश फोन लॉन्च; घडी करुन खिशात ठेवता येणार, फीचर्सही भन्नाट

Oppo Find N3 Flip Specification : भारतात चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने Find N3 Flip फोन लॉन्च केला आहे.

कोमल दामुद्रे

Oppo Find N3 Flip Features :

अखेर ग्राहकांची प्रतिक्षा संपली आहे. भारतात चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने Find N3 Flip फोन लॉन्च केला आहे. सॅमसंग आणि मोटारोलानंतर काही महिन्यांपूर्वी ओप्पो ही फोल्डेबल फोन लॉन्च करणारी तिसरी कंपनी आहे.

काही दिवसांपूर्वी ओप्पोने Find N3 Flip टीझर लॉन्च केला होता आणि आज हा फोन लॉन्च झाला आहे. मागच्या महिन्यात चीनमध्ये Oppo ने Find N3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. जाणून घेऊया या फोनची किमत आणि फीचर्स

1. फीचर्स (Feature)

Oppo Find N3 Flip हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि २ रंगामध्ये लॉन्च केला आहे. हा फोन फ्लिपकार्टद्वारे बुक (Book) करता येईल. तसेच १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ९४,९९९ रुपये इतकी आहे. परंतु ऑफरमध्ये हा फोन १२००० रुपयांच्या डिस्काउंटवर मिळेल.

2. या बँकांच्या ऑफर्स

जर तुम्ही हा फोन (Phone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Axis, ICICI, Kotak Mahindra आणि Flipkart Axis च्या बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करु शकता. यावर तुम्हाला ६००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच काही कंपनीवर १२००० रुपयांची सूट देखील मिळणार आहे.

3. Oppo Find N3 Flip चे स्पेसिफिकेशन

Oppo Find N3 Flip मध्ये 1080x2520 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश दर देते. या फ्लिप फोन 382x720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 3.26-इंचाच्या डिस्प्लेसह येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT