होंडाच्या बाइकची भारतीय बाजारात प्रचंड क्रेझ आहे. दमदार मायलेज आणि उत्तम रेंजमुळे या कंपनीच्या बाईक्स भारतीयांच्या पसंतीस उतरतात. दुचाकीची वाढती मागणी पाहाता होंडाने दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत.
होंडाच्या या दोन्ही बाईक्स हिरो आणि बजाजला टक्कर देतील असे म्हटले आहे. Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने Honda CB350 आणि CB350RS च्या दोन नवीन Edition लाँच केल्या आहेत, ज्या CB350 Legacy Edition आणि CB350 RS न्यू ह्यू एडिशन आहेत.
Honda CB350 Legacy Edition आणि CB350 RS न्यू ह्यू एडिशन ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टीमने परिपूर्ण आहे. या H'ness CB350 लेगसी एडिशनमध्ये नवीन पर्ल सायरन ब्लू कलर स्कीममध्ये तयार करण्यात आले आहे. तसेच इंधनच्या टाकीवर नवीन बॉडी ग्राफिक्स आणि लेगसी एडिशन बॅज मिळतो.
न्यू एडिशनमध्ये दोन रंगांचे पर्याय आहे. स्पोट् स्पोर्ट्स रेड आणि अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक पेंट. याच्या दोन्ही चाकांवर आणि फेंडरवर स्ट्रिप्स मिळतील. याचा बॉडी कलर रियर ग्रॅब हँडल आणि हेडलाइट कव्हर देखील मिळते. या बाईक्स ऑफ रोडवरही चालवता येतील.
होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम (HSVCS) डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. या दोन्ही बाईक्समध्ये असिस्ट स्लिपर क्लच आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) सिस्टीम देखील आहे.
यामध्ये 348.36cc, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BS-VI, OBD2, PGM-FI इंजिन आहे, जे 5,500rpm वर 20.7bhp आणि 3,000rpm वर 30Nm जनरेट करेल. दोन्ही बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.