आजकाल प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली धावपळीची झालीये. चुकीचा आहार आणि सतत तेलकट पदार्थांचं वाढलेलं सेवन यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं दिसून येतंय. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तुमच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊन तो मंदावू शकतो. परिणामी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात काही भाज्यांचा समावेश केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये कांद्याचाही समावेश होतो.
कांदा हा रोजच्या स्वयंपाकात सहज वापरला जाणारा पदार्थ आहे. जेवणासोबत कच्चा कांदा सलाड म्हणून खाल्ला जाऊ शकतो. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचा घटक आढळतो. हा घटक बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो.
कच्च्या कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात. हे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा घटक पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. आहारात कांद्याचा समावेश केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. परंतु केवळ कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होईल असं नाही. कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी आहारातून तेलकट आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ कमी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर कांदा योग्य पद्धतीने खाणं महत्त्वाचं आहे. कच्चा कांदा सलाडच्या स्वरूपात खाऊ शकता. दररोजच्या आहारात साधारण एक कांदा समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
दुपारच्या जेवणासोबत कच्चा कांदा खाणं हा एक पर्याय आहे. दुपारी जेवणाच्या वेळी कांदा सलाड म्हणून खाल्ल्यास तो आहाराचा भाग सहज बनू शकतो. याशिवाय रात्रीच्या जेवणासोबतही कांदा खाऊ शकता.
कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी जंक फूडचं सेवन शक्य तितकं कमी करा. जंक फूडमध्ये अनेकदा जास्त प्रमाणात तेल, चरबी आणि कॅलरीस असतात. अशा पदार्थांचं वारंवार सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज आणि इतर जंक फूडऐवजी पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट घेणं महत्त्वाचं आहे. योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.