Fact: तुमच्या TV वर दिसणारा 'तो' क्रमांक का असतो? जाणून घ्या Saam TV
लाईफस्टाईल

Fact: तुमच्या TV वर दिसणारा 'तो' क्रमांक का असतो? जाणून घ्या

मोबाइल स्क्रीनवर कितीही ओटीटी प्लॅटफॉर्म आले तरी दूरदर्शनचे महत्त्व संपणार नाही. आणि चॅनेलही संपणार नाहीत.

साम टिव्ही ब्युरो

मोबाइल स्क्रीनवर कितीही ओटीटी प्लॅटफॉर्म आले तरी दूरदर्शनचे महत्त्व संपणार नाही. आणि चॅनेलही संपणार नाहीत. आपण सर्वजण आपल्या आवडीनुसार टीव्ही चॅनेल पाहतो. कधी क्रिकेट, कधी सिनेमा. तुमचा आवडता शो किंवा क्रिकेट मॅच पाहताना, तुमच्या लक्षात आले आहे की काही वेगळे नंबर टीव्ही स्क्रीनवर येत राहतात? हे बघून तुम्ही विचार केला आहे का की ते कोणत्याही शोच्या वेळी टीव्हीच्या पडद्यावर का येतात? चला आपण जाणून घेवूयात

वेगवेगळ्या टीव्ही सेटवर हे क्रमांक वेगवेगळे असतात. कारण प्रत्येकाचा सेट टॉप बॉक्स वेगळा असतो. कोणत्याही कंपनीचा सेट टॉप बॉक्स असूद्या, पण तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर नंबर दिसतील. सर्व सेट टॉप बॉक्ससाठी वेगवेगळे क्रमांक तयार केले जातात. म्हणूनच प्रत्येकाच्या टीव्हीमध्ये दिसणारे हे क्रमांक इतरांपेक्षा वेगळे असतात. याला व्हीसी नंबर अर्थात व्ह्यूईंग कार्ड नंबर असेही म्हणतात.

या क्रमांकामागे काय खेळ आहे?

खरं तर, टीव्हीवर हा नंबर फ्लॅश करण्यामागे एक विशेष कारण आहे. आजच्या काळात, लोक टीव्हीवरुन सामग्री चोरतात आणि ते यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकतात. जसे आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर क्रिकेट मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग खेळणे किंवा शो रेकॉर्ड करणे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करणे. ही सर्व कामे पायरसीच्या कक्षेत येतात. हे टाळण्यासाठी, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक विशेष क्रमांक सतत येत असतो.

अशी थाबवतात पायरसी

कोणत्याही टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा नंबर सेट टॉप बॉक्सचा युनिक आयडी आहे. यात ग्राहकांच्या माहितीचा समावेश आहे. जसे की नाव आणि पत्ता. जर कोणी टीव्हीवर चालत असलेल्या कोणत्याही शोची नोंद केली तर हे क्रमांक त्यामध्ये रेकॉर्ड केले जातील. जेव्हा कोणीही तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतो, तेव्हा चॅनेल त्याला त्या नंबरच्या मदतीने ओळखेल. यावरून हे समजेल की या शोचे रेकॉर्डिंग कुठे केले गेले आहे. अशाप्रकारे, या नंबरच्या मदतीने पायरसी करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे कारवाई करता येईल. कारण आजच्या डिजिटल युगात, कोणीही कोणत्याही टीव्ही चॅनेलवर चालणाऱ्या शोचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. हे टाळण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT