Early Cancer Detection Formula saam tv
लाईफस्टाईल

Early Cancer Detection Formula: आता ३ वर्षाआधीच कळणार कॅन्सर होणार की नाही! रिसर्चर्सने शोधला नवा फॉर्म्युला

Early Cancer Detection Formula: शास्त्रज्ञांनी एक नवीन फॉर्म्युला शोधून काढला आहे ज्याद्वारे कॅन्सर सुरू होण्याच्या 3 वर्षांपूर्वीच तो शोधता येणं शक्य आहे. याचा अर्थ अनेक जीव वाचवता येऊ शकणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर म्हटलं की, आपल्या पायाखलाची जमीन सरकते. तज्ज्ञ म्हणतात की, कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून त्यावर उपचार केले तर ते फायद्याचं असतं. असंच जर तुम्हाला कॅन्सर होण्याच्या ३ वर्षांपूर्वी समजलं तर.... जर तुम्हाला तीन वर्षे आधीच कळले की तुमच्या शरीरात एक गंभीर आजार होणार आहे, तर तुम्ही तो वेळेत थांबवू शकणार नाही का?

आजच्या काळात कॅन्सर हा एक प्राणघातक आजार मानला जातो. त्यामुळ लवकर निदान हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. त्याच दरम्यान एका नवीन संशोधनामुळे आशेचा एक मोठा किरण जागृत झाला आहे.

संशोधकांच्या एका ग्रुपने असा फॉर्म्युला शोधून काढला आहे की जो कॅन्सर सुरू होण्याच्या तीन वर्षांपूर्वी त्याचे संकेत देऊ शकतो. याचाच अर्थ ज्यावेळी हा आजार शरीरात पूर्णपणे विकसित झालेला नसतो तेव्हा त्याची लक्षणं शोधता येतात.

काय आहे हा नवा रिसर्च?

केंब्रिजच्या शास्त्रज्ञांनी काही बायोमार्कर्सना समजून घेतलं आहे जे कॅन्सर होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी शरीरात दिसू लागतात. ही चिन्हं शरीराच्या आत होत असलेल्या बदलांना सूचित करतात. जे सामान्य पेशींचं कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत.

हा फॉर्म्यूला कसं काम करतो?

या संशोधनात रक्ताचे नमुने आणि जीनोमिक डेटाच्या मदतीने शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, कॅन्सर होण्याच्या तीन वर्षांपूर्वी शरीरात काही प्रोटीन आणि अनुवांशिक बदल एक्टिव्ह होतात. या बायोमार्कर्सचा मागोवा घेण्यासाठी एक विशेष टेस्ट विकसित केली जातेय. ही टेस्ट रक्त चाचणीद्वारे कार्य करणार आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात ही चाचणी नियमित आरोग्य तपासणीचा भाग बनू शकते.

कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर अभ्यास करण्यात आला?

  • फुफ्फुसांचा कॅन्सर

  • यकृताचा कॅन्सर

  • आतड्यांचा कॅन्सर

  • स्तनाचा कॅन्सर

या संशोधनाचे काय आहेत फायदे?

  • लवकर निदान- यामुळे वेळेत निदान होणार असून कॅन्सरवर वेळेत उपचार करता येऊ शकतात.

  • खर्चात कपात- लवकर उपचार कमी खर्चिक आणि अधिक प्रभावी असतात.

  • मृत्यूदरात घट होणं- या पद्धतीमुळे मृत्युदरात मोठी घट शक्य आहे

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT