ब्रेस्ट कॅन्सर फक्त गाठीपुरता मर्यादित नसतो.
स्तनाच्या आकारात अचानक बदल गंभीर लक्षण आहे.
त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसणे कॅन्सरचा इशारा असू शकतो.
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. त्यामुळे याबद्दल सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. बहुतांश महिलांना वाटतं की, स्तनात गाठ जाणवणं हेच याचं एकमेव सुरुवातीचं लक्षण आहे. पण खरं म्हणजे कधी कधी ब्रेस्ट कॅन्सर गाठ नसतानाही होऊ शकतो आणि काही वेगळ्या लक्षणांतून तो आपले संकेत देतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या लक्षणांकडे लक्ष दिलं आणि लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर जीव वाचू शकतो. आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, ब्रेस्टमध्ये गाठ दिसण्याव्यतिरीक्त अजून कोणती लक्षणं दिसून येतात.
स्तनाच्या आकारात अचानक बदल होणं हे गंभीर लक्षण असू शकतं. जसं की एक स्तन दुसऱ्यापेक्षा मोठा किंवा लहान दिसणं, खाली झुकलेला जाणवणं किंवा असामान्य आकार दिसणं. कॅन्सरच्या पेशी स्तनाच्या ऊतींमध्ये बदल घडवतात आणि त्याचा परिणाम बाह्यरूपावरही दिसतो.
त्वचेच्या रंगात बदल दिसणं ही देखील एक महत्त्वाची खूण आहे.
त्वचा लालसर, गरम किंवा सूजलेली वाटणं- हे इन्फेक्शनसारखं दिसतं, पण बरं न झाल्यास हे इनफ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
त्वचा जाडसर होणं किंवा संत्र्याच्या सालासारखी दिसणं – म्हणजेच त्वचेवर लहान खड्डे पडणं. हे कॅन्सर पेशींमुळे लिम्फ वेसल्स ब्लॉक झाल्यावर होतं.
सतत खाज येणं, पुरळ किंवा फोडं – विशेषतः निप्पलजवळील त्वचेवर असे बदल दिसून येतात. मुख्य म्हणजे क्रीम लावूनही बरे होत नसतील तर त्याला हलकं घेऊ नये.
निप्पलमधून स्त्राव – कोणत्याही दाबाशिवाय द्रव बाहेर पडणं. हा स्त्राव रक्ताळ, पाण्यासारखा किंवा इतर रंगाचा असू शकतो. स्तनपान न करणाऱ्या महिलांमध्ये असं होणं सामान्य नाही.
निप्पलभोवती त्वचेतील बदल – त्वचा सोलणं, फाटणं किंवा खरूज येणं ही लक्षणंही महत्त्वाची आहेत.
बहुतांश वेळा ब्रेस्ट कॅन्सर वेदनारहित असतो. पण काही महिलांना स्तनात किंवा बगलित सतत वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. या वेदना पाळीशी संबंधित नसतात आणि सतत टिकून राहतात. बगलित वेदना किंवा सूज दिसल्यास कॅन्सर तिथल्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरल्याचं सूचक असू शकतं.
कधी कधी गाठ फार छोटी किंवा आत खोलवर असते, त्यामुळे ती हाताला लागत नाही. पण त्या भागात सूज, जडपणा किंवा वेगळेपणा जाणवतो. ब्रेस्टमध्ये कुठेही सूज येणं, अगदी हनुवटीजवळ किंवा बगलेत सूज दिसणं देखील ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षणं असू शकतं.
ब्रेस्ट कॅन्सरचे गाठीखेरीज इतर लक्षण कोणते?
आकारात बदल, त्वचेत बदल, स्त्राव, सूज किंवा वेदना ही इतर लक्षणे आहेत.
स्तनाच्या त्वचेवर संत्र्याच्या सालीसारखे दिसणे का गंभीर आहे?
लिम्फ वेसल्स ब्लॉक झाल्यामुळे त्वचेवर खड्डे पडतात, हे कॅन्सरचे लक्षण आहे.
निप्पलमधून स्त्राव होणे का धोकादायक आहे?
स्तनपान न करणाऱ्या महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या स्त्राव होणे सामान्य नाही.
बगलेत सूज किंवा वेदना कोणत्या समस्येचा संकेत देते?
बगलेतील सूज कॅन्सरच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरण्याचा संकेत देते.
ब्रेस्ट कॅन्सरच्या लवकर निदानासाठी काय करावे?
असामान्य बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.