Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Sugar and tooth decay: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दात किडणे हे जगातील सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहे. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण यामुळे गंभीर वेदना आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
Tooth decay causes
Tooth decay causessaam tv
Published On
Summary
  • साखरेचं अतिसेवन दातांच्या किडीस कारणीभूत आहे.

  • जगात २.५ अब्ज लोक दातांच्या किडीने त्रस्त आहेत.

  • फ्री शुगर म्हणजे प्रोसेस्ड केलेली साखर आणि फळांचा रस.

साखर आपल्या रोजच्या आयुष्यात जवळपास सर्वत्र असते. मग ते कोल्ड ड्रिंक असो, स्नॅक्स असो किंवा आरोग्यदायी समजले जाणारे पदार्थ. लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार या विषयांवर साखरेविषयी नेहमी चर्चा होत असते. पण आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) साखरेच्या अजून एका धोकादायक इशारा देत आहे. हा इशारा आहे दातांच्या किडेसंदर्भात.

WHO च्या मते, जर आपण साखरेचं सेवन कमी केलं किंवा पूर्णपणे टाळले, तर जगभरातील अब्जावधी लोक दातांच्या किडण्यापासून वाचू शकतात.

WHO ने काय सांगितले?

WHO च्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात 2.5 अब्जांहून अधिक लोक दातांच्या किडीने त्रस्त आहेत. यामध्ये 2 अब्ज प्रौढ लोकांच्या कायमस्वरूपी दातांमध्ये किड आहे. तर अर्धा अब्जाहून अधिक मुलांच्या दुधाच्या दातांमध्ये किड झालेली आहे.

WHO ने स्पष्ट केलंय की, फ्री शुगर म्हणजेच प्रोसेस्ड केलेल्या पदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये घातलेली साखर किंवा नैसर्गिक स्वरूपात सिरप, मध आणि फळांच्या रसामध्ये असलेली साखर ही दातांच्या किडीची मुख्य कारणीभूत आहे. त्यामुळे साखरेचं सेवन हे दिवसातील एकूण उर्जेच्या 10% पेक्षा कमी असावं आणि शक्यतो 5% पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे.

Tooth decay causes
Fatty Liver Symptoms On Skin : चेहरा आणि त्वचेवर दिसतायत फॅटी लिव्हरची लक्षणं? जाणून घ्या...

दातांची किड म्हणजे काय?

दातांची किड ही फक्त सौंदर्य बिघडवणारी समस्या नाही, तर एक गंभीर आजार आहे. तोंडातील प्लाकमधील जंतू आम्ल तयार करतात. हे आम्ल दातांच्या बाहेरील थरावर म्हणजेच इनॅमलवर परिणाम करतता. सुरुवातीला हलकी संवेदनशीलता जाणवते पण दुर्लक्ष केल्यास यामुळे कायमस्वरूपी वेदना, खाण्यात त्रास, दात पोखरणं, संसर्ग होणं आणि शेवटी दात गमावण्याची वेळ येऊ शकते.

किड कशी तयार होते?

दातांची किड ही हळूहळू वाढणारी प्रक्रिया असून गोड पदार्थ किंवा पेय घेतल्यानंतर प्लाकमधील जंतू त्यातील साखरेतून आम्ल तयार करतात. हे आम्ल दातांच्या इनॅमलला हळूहळू कमजोर करत जातात. वेळेवर काळजी न घेतल्यास ही किड दातांच्या आतल्या भागापर्यंत पोहोचते.

खरी समस्या काय आहे?

दातांच्या समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. पण WHO च्या मते, जगभरात दातांच्या किडीचं मुख्य कारण म्हणजे साखर. कोल्डड्रींक, पॅकबंद ज्यूस, ब्रेकफास्ट सीरियल्स, सॉस आणि अगदी हेल्थ बार्समध्येही साखर मोठ्या प्रमाणावर आढळते. लोकांना जाणूनबुजून किंवा नकळत सुरक्षित प्रमाणापेक्षा जास्त साखर सेवन करावी लागते. यामुळे केवळ दातांची किडच नाही तर लठ्ठपणा, टाईप-2 मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या देखील वाढतात.

Tooth decay causes
Fatty liver: रात्रीच्या वेळेस दिसतात फॅटी लिव्हरची लक्षणं; शरीरात 'हे' बदल होत असतील तर सावध व्हा

दातांची किड कशी टाळावी?

सुखद गोष्ट म्हणजे दातांची किड टाळता येऊ शकते. साखरेचं सेवन कमी करणं हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्यासोबतच दररोज दोन वेळा फ्लोराईड टूथपेस्टने दात घासणं, फ्लॉस करून प्लाक काढणं आणि नियमित दंतचिकित्सकाकडे तपासणी करणं आवश्यक आहे.

Tooth decay causes
Fatty liver symptoms in women: महिलांना फॅटी लिव्हरचा त्रास झाल्यास शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच जाणून द्या लक्षणं
Q

WHO नुसार दातांच्या किडीचे मुख्य कारण काय आहे?

A

प्रोसेस्ड पदार्थांमधील साखर (फ्री शुगर) हे मुख्य कारण आहे.

Q

जगभरात दातांच्या किडीने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या किती आहे?

A

२.५ अब्जाहून अधिक लोक दातांच्या किडीने त्रस्त आहेत.

Q

दातांची किड कशी तयार होते?

A

तोंडातील जंतू साखरेतून आम्ल तयार करून इनॅमल नष्ट करतात.

Q

दातांच्या किडीपासून बचावासाठी WHO किती साखर सेवन सुचवते?

A

दिवसाच्या एकूण उर्जेच्या ५% पेक्षा कमी साखर सेवन सुचवले आहे.

Q

दातांची किड टाळण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?

A

साखर कमी करणे, फ्लोराईड टूथपेस्टने दात घासणे, फ्लॉस करणे आणि नियमित तपासणी करणे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com