Fatty liver symptoms at night google
लाईफस्टाईल

Fatty Liver: झोप पूर्ण होत नाहीये, सतत जाग येतेय? फॅटी लिव्हरची ही लक्षणे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Liver Disease: फॅटी लिव्हरची लक्षणे रात्री अधिक प्रकर्षाने जाणवतात. झोप न लागणे, पोट दुखणे, थकवा, सूज, भूक कमी होणे आणि पिवळसरपणा ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. वेळेत तपासणी गरजेची आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • फॅटी लिव्हरची लक्षणे रात्री अधिक स्पष्ट दिसतात.

  • झोपेच्या तक्रारी, पोट दुखणे, थकवा ही लक्षणे धोकादायक ठरू शकतात.

  • लिव्हरवर परिणाम झाल्यास डोळ्यात पिवळसरपणा, सूज आणि वजन कमी होते.

  • वेळेत तपासणी व जीवनशैलीत बदल करून हा आजार टाळता येतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे लिव्हरवर थेट परिणाम होत आहे. जगभरात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा एक गंभीर आरोग्याचा विषय ठरत आहे. अंदाजे 30.2 टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित झाले असून अमेरिका आणि आग्नेय आशियामध्ये हा दर 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होणे. मात्र हे मद्यपानामुळे होत नाही. लठ्ठपणा, टाईप 2 डायबेटिस आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांच्याशी या आजाराचा जवळचा संबंध आहे. साधं शरीरात फॅट साचण्यापासून (NAFL) ते सूज आणि शरीराचे आतून नुकसान (NASH) अशा विविध टप्प्यांतून हा विकार विकसित होत असतो. 'सायलेंट एपिडेमिक' म्हणून ओळखला जाणारा हा आजार वेळेत ओळखला गेला नाही, तर तो सिरॉसिससारख्या गंभीर टप्प्यांपर्यंत पोहोचू शकतो.

प्रमुख लक्षणे

दिवसा तुम्हाला अनेक लक्षणे जाणवतात, मात्र काही चिन्हे रात्री जास्त प्रकर्षाने दिसून येतात. फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांना रात्री झोपेच्या तक्रारी जाणवतात. झोप लागण्यात अडचण, वारंवार जाग येणे, शरीरात साचलेल्या विषारी घटकांमुळे अस्वस्थता अशा समस्या जाणवतात. ब्लड शुगरचे असंतुलनही झोपेवर परिणाम करतं. याशिवाय, पोटाच्या उजव्या बाजूला अचानक दुखायला सुरुवात किंवा दडपण जाणवतं या समस्या रात्री वाढतात. जेवणात विशेषतः रात्री भूक कमी होणे किंवा जेवण्याची ईच्छा नसणे हे लक्षण देखील फॅटी लिव्हरशी संबंधित असू शकते. कालांतराने हे वजन कमी होणे आणि पोषणाच्या समस्या निर्माण करू शकते.

फॅटी लिव्हरमुळे विषारी घटक रक्तात साचल्याने मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक थकवा, एकाग्रतेत कमतरता आणि 'ब्रेन फॉग' निर्माण होऊ शकतो. सतत थकवा जाणवणे, हात-पाय सूजणे, रात्री सूज वाढणे, त्वचेला खाज येणे, अनपेक्षितपणे वजन कमी होणे ही देखील धोक्याची चिन्हे आहेत. गंभीर टप्प्यात लिव्हर कार्यक्षमता कमी झाल्याने पिवळसरपणा म्हणजेच 'जॉन्डिस' दिसू शकतो. त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला पिवळसर रंग येणे हे या स्थितीचे प्रमुख लक्षण आहे आणि त्याकडे त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी लक्ष दिले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krushna Abhishek: अभिषेक बच्चनमुळे या कॉमेडियनने बदलले नाव; अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT