Norovirus व्हायरस Saam Tv
लाईफस्टाईल

Norovirus Symptoms : कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धोका, ब्रिटनने दिला गंभीर इशारा

mumbai: कोरोनाचा प्रकोप संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कोरोनानंतर आता आणखी एका नव्या व्हायरसचं आगमण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोनाचा प्रकोप संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कोरोनानंतर आता आणखी एका नव्या व्हायरसचं आगमण झाले आहे. हा नवीन प्रकारच्या नोरोव्हायरस संसर्ग 'कावासाकी बग' (Kawasaki Bug) ब्रिटनमध्ये वेगाने पसरण्याचा इशारा दिला आहे. या नवीन संसर्गामुळे उलट्या आणि जुलाबाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनानंतर हा विषाणू आता एक नवीन आव्हान म्हणून समोर आला आहे, त्यासंदर्भात ब्रिटिश डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

AXA हेल्थचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जॉन बर्क यांनी नोरोव्हायरसच्या या नवीन स्ट्रेनबद्दल माहिती दिली आणि ते टाळण्यासाठी उपायांवर भर दिला. ते म्हणाले की, नोरोव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे, जो संपर्कातून पसरतो आणि संक्रमित व्यक्तीमध्ये उलट्या आणि जुलाबाची लक्षणे दिसू शकतात. हिवाळ्यात याला 'विंटर व्होमीटिंग बग' असे म्हणतात, कारण या काळात बहुतेक लोक घरातच राहतात आणि विषाणू वेगाने पसरतो.

कावासाकी बगची सहा प्रमुख लक्षणे

मळमळ

उलट्या

अतिसार

उच्च ताप

डोकेदुखी

थकवा

नोरोव्हायरसच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी काय कराल?

नोरोव्हायरसची लक्षणे सामान्यत: घरी नियंत्रित केली जाऊ शकतात आणि काही दिवसात यातून बरे होणे देखील शक्य आहे. डॉक्टर बर्क सांगतात की, उलट्या आणि जुलाबामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. म्हणून, या काळात भरपूर द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे सेवन करणे महत्वाचे आहे.

डॉ. बर्क यांनी सल्ला दिला की जेव्हा तुम्हाला नोरोव्हायरसचा त्रास होत असेल तेव्हा तुम्ही हलक्या आणि पचायला सोपे पदार्थ खावेत. शिवाय, या संक्रमणादरम्यान विश्रांती घेणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ मिळेल. किमान 48 तास घरी राहा आणि पूर्णपणे निरोगी झाल्यावरच बाहेर जा. ब्रिटीश डॉक्टरांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 

Edited By- नितीश गाडगे

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडणून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

Maharashtra Exit Poll: संगरनेरमध्ये बाळासाहेब थोरात होणार आमदार? VIDEO

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT