Night Shift Side Effects google
लाईफस्टाईल

Night Shift Health : दिवसा झोप, रात्री काम? मग ‘ही’ लक्षणं तुमचं आरोग्य बिघडवू शकतात

Mental Health Matters : रात्रीच्या ड्युटीमुळे झोप बिघडते, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. हे टाळण्यासाठी योग्य उपाय वाचा.

Sakshi Sunil Jadhav

  • नाईट शिफ्टमुळे सर्केडियन लय बिघडते आणि झोपेवर परिणाम होतो.

  • झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक तणाव आणि बर्नआउट होतो.

  • कुटुंब आणि नात्यांवर परिणाम होतो, एकटेपणा वाढतो.

  • योग्य झोप, वेळेचे नियोजन आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

प्रत्येकाच्या कामाच्या वेळा बदलत चाललेल्या आहेत. काहींना रात्र पाळीचे काम करायला आवडतं किंवा जमतं. काहींना सकाळच्या वेळेस काम करायला योग्य वाटतं. अर्थात हा बदल देशाच्या विकासासाठी योग्य मानला असला तरी शरीरासाठी योग्य ठरु शकत नाही. पण रात्रीच्या वेळेस काम करण्याऱ्या व्यक्तींना अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याबद्दल आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.

तुमच्या स्वभाव चिडचिड होत असेल तर अपुरी झोप आणि चुकीच्या वेळी झोप हे महत्वाचे कारण असू शकते. दिवसा प्रकाश आणि आवाजामुळे तुम्हाला गाढ झोप लागू शकत नाही. त्यातच रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या बहुतेक लोकांना दिवसा पुरेशी आणि गाढ झोप येत नाही. त्यामुळे रात्री काम करणाऱ्या व्यक्तीचे वेळापत्रक इतर व्यक्तींपेक्षा वेगळे असते. नकळत याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर होतो.

बहुतेक वेळा अशा व्यक्ती एकट्या राहतात. नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. आणि त्याला भावनिक आधार मिळत नाही. याच मुळे मानसिक ताण वाढतो. यालात बर्नआउट म्हणतात. योग्य जीवनशैली, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक काळजी घेऊन हे परिणाम तुम्ही टाळू शकता. तुम्हाला कोणतेही गंभीर मानसिक लक्षणे जाणवली तर लगेच डॉक्टरांकडे धाव घ्या.

Q1: नाईट शिफ्टमध्ये काम केल्याने कोणते शारीरिक त्रास होतात?

A1: झोपेचा अभाव, थकवा, लक्ष केंद्रीकरण कमी होणे, सर्केडियन लय बिघडणे, पचनाच्या समस्या होऊ शकतात.

Q2: मानसिक आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो?

A2: चिडचिड, तणाव, नैराश्य, सामाजिक नात्यांपासून अंतर, एकटेपणा आणि बर्नआउटची लक्षणं दिसू शकतात.

Q3: झोपेची कमतरता टाळण्यासाठी काय करावे?

A3: गडद आणि शांत खोलीत झोप, झोपेची ठरलेली वेळ, मोबाईल वापर टाळा, स्लीप हायजीन पाळा.

Q4: या त्रासांपासून बचावासाठी काय उपाय आहेत?

A4: व्यवस्थित वेळापत्रक तयार करा, संतुलित आहार घ्या, वर्क-लाइफ बॅलन्स ठेवा, गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT