हिवाळा म्हटंल की, गुलाबी थंडीत फिरण्याची मज्जा काही औरच! नवीन वर्षात तुम्ही फिरण्याचा प्लान करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी बजेटमध्ये काही टूर प्लान आणले आहेत.
हिवाळ्यातील थंडगार वातावरण बघून अनेकांना निसर्गरम्य पर्यटनस्थळी फिरायला जायला आवडते. जर तुम्हालाही यंदाच्या हिवाळयात किंवा नवीन वर्षात फिरायला जायचे असेल तर IRCTC चा नवा टूर प्लानला भेट देऊ शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेल्वेच्या (Railway) या टूर पॅकेजमध्ये तुम्ही पर्यटनस्थळांना आणि धार्मिक स्थळांना भेट देतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी राहाण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. IRCTC ने पर्यटकांना नॉर्थ ईस्ट टूर पॅकेज (Package) आणले आहे.
1. ७ दिवसांचं टूर पॅकेज
IRCTC चे नॉर्थ ईस्ट टूर पॅकेज चेन्नईपासून सुरु होणार आहे, हे टूर पॅकेज ६ रात्र आणि ७ दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजचे नाव नॉर्थ ईस्ट एक्स चेन्नई आहे. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटक विमानाने प्रवास (Travel) करु शकतील.
2. टूर पॅकेज कधीपासून सुरु होईल?
IRCTC चे हे टूर पॅकेज नोव्हेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असणार आहे. या टूरपॅकेजमध्ये चेरापुंजी, गुवाहाटी रोड, मावलिनाँग आणि शिलाँग फिरता येईल. या टूर पॅकेजची किंमत ४४,५०० रुपये आहे. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत साइट्सवरुन बुक करता येईल.
3. IRCTC च्या टूर पॅकेजची किंमत
IRCTC च्या या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्तीसाठी ५३,६०० रुपये आहे. जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये पार्टनरसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्तीसाठी ४७,५०० रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर प्रति व्यक्तीसाठी ४४,५०० रुपये भरावे लागतील. या टूर पॅकेजमध्ये ५ ते ११ वर्ष वयोगटातील मुलेही तुमच्यासोबत प्रवास करत असतील तर त्यांचे भाडे ४२,५०० रुपये लागतील. २ ते ४ वर्ष वयोगटातील मुलांचे भाडे ३८,५०० रुपये ठेवण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.