आता जगभरात न्यू इयरचं प्लानिंग करणं सुरू झालय. येणारं वर्ष आनंदात जावो अशासाठी वर्षाचा शेवटचा दिवस मोठ्या धामधुमीत साजरा करतात. या दिवसांमध्ये काही लोक बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. तर काही लोक मोठ्या हॉटेलांमध्ये जावून न्यू इयर सेलिब्रेट करतात. तुम्ही या पैकी कोणताच प्लॅन केला नसेल तर नो टेंशन तुम्ही कामाच्या धावपळीत असाल तर तुम्ही घरच्याघरी छान पद्धतीने न्यू इयर सेलिब्रेट करू करा. सेलिब्रेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे केक. त्यासाठी तुम्ही घरच्यांची काळजी घेत झटपट केक तयार करू शकतात. त्यात तुम्ही साखर किंवा अंड न मिक्स करता सोपा आणि पौष्टीक केक तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
बदाम केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
१ कप बदाम पावडर
१ कप मैदा
१ कप दूध
दीड ग्रॅम पावडर केलेली साखर
दीड कप बटर
दीड कप कंडेन्सड मिल्क
१५ ते २० बदाम
६ ते ७ वेलची
१ चमचा बेकींग पावडर
पाव चमचा बेकींग सोडा
१ चमचा इंस्टंट कॉफी पावडर
कृती
सर्वप्रथम तुम्ही एक मोठं वाडगं घ्या. त्यात वितळवलेलं आणि रूम टेंप्रेचरवर असलेलं बटर अॅड करा. आता पावडर शुगर घ्या आणि ती पण अॅड करून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्याची एक घट्ट जाडसर पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर कंडेन्सड मिल्क अॅड करून पुन्हा ते मिश्रण घट्टसर एका चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्या. आता दुसऱ्या बाजूला एक वेगळे भांडे घ्या.
आता एका भांड्यात मैदा बेकींग सोडा, बेकींग पावडर मिक्स करून बारिक चाळणीने चाळून घ्या. आता त्याच भांड्यात बदामाची पावडर मिक्स करून घ्या. हे मिक्स झाल्यावर वेलची पावडर अॅड करा. आता आधीचे मिश्रण घ्या आणि त्यात कॉफी पावडर अॅड करून दोन चमचे दूध मिक्स करून छान चॉकलेटी रंग तयार करा. आता तुमचे बॅटर तयार झाले आहे. तुम्ही आता मैदा त्यात मिक्स करून दूध अॅड करा. हे बॅटर तुम्ही व्यवस्थित घट्टसर आणि व्यवस्थित मिक्स करून तयार करा. आता तुम्ही हव्या त्या आकाराच्या भांड्यात ते तयार बॅटर अॅड करून घ्या. त्या आधी त्याला बटर लावायला अजीबात विसरू नका. बटर लावल्याने तुमचा केक भांड्याला चिकटणार नाही.
तुम्ही आता शेवटची स्टेप काळजी पुर्वक करणे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही ओवन, कुकर किंवा कोणतेही भांडे घ्या ज्यात तुम्ही तुमचा केक बेक करू शकता. आता जर तुम्ही घड्याळ्याच्या काटावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. तुम्ही ओवन मध्ये किंवा कोणत्याही २० मिनिटांपेक्षा जास्त केक ठेवू नका. त्याने तुमचा केक कोरडा होईल. आता तुम्ही केक ठेवा आणि २० मिनिटांनी तो झालाय का पाहा. त्यासाठी तुम्ही टूथपीकचा सुद्धा वापर करू शकता. त्याला जर बॅटर चिकटत नसेल तर तुमचा केक खाण्यासाठी तयार आहे. हा केक तुम्ही लहान मुलांसाठी कधीही तयार करून देऊ शकतात.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.