ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले बदामाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
भिजवलेले बदाम खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला दिवसभरासाठी उर्जा मिळते.
भिजवलेल्या बदामात रिबोफ्लेविन आणि एलकार्निटाइन असल्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते
बदाम खाल्ल्याने शरीरातील कॅालेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बदामात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
भिजवलेल्या बदामात व्हिटॅमिन ई आणि अॅंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
बदामामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
NEXT: विना साखरेचा चहा प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे