ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय आहे. पण जास्त प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
साखर नसलेला चहा प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील उर्जा पातळी स्थिर राहते.
विना साखरेचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि चयापचय सुधारते.
मधुमेह रुग्णांसाठी विना साखरेचा चहा हा खूप फायदेशीर आहे.
साखर नसलेला चहा तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण यामुळे दात निरोगी राहतात.
विना साखरेचा चहा प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते. आणि पचनक्रिया सुधारते.
दररोज विना साखरेचा चहाचे सेवन केल्यास त्वचा निरोगी राहते आणि त्वचा चमकदार होते.
दररोज विना साखरेचा चहा प्यायल्यास हृदयाचे विकार,मधुमेह, फॅटी लिव्हर अशा अनेक आजारांचा धोका कमी होतो.
NEXT: 'या' पदार्थांचा आहारात समावेश केल्यास 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता होईल पूर्ण