New Year Resolution 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

New Year Resolution 2024 : नवीन वर्षात या ४ गोष्टी लक्षात ठेवा, नेहमी राहाल निरोगी

How to Keep Your New Year's Resolutions: निरोगी राहाण्यासाठी आपल्याला काही सवयी बदलणे गरजेचे आहे. अनेक आजार हे आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. जसे की, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार.

कोमल दामुद्रे

New Year Resolution Plan :

निरोगी राहाण्यासाठी आपल्याला काही सवयी बदलणे गरजेचे आहे. अनेक आजार हे आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. जसे की, लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes) आणि हृदयविकार. यामध्ये मेंदूच्या संबंधित आजारही आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात.

त्यासाठी आपल्याला निरोगी राहायचे असेल तर जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. येत्या नवीन वर्षात आपण आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घेताना आपण कोणत्या ४ गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घेऊया.

1. तेलकट पदार्थ खाणे

आजकालच्या जीवनशैलीत आपण रोज तेलकट पदार्थ खातो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आहारात तेलाचे पदार्थ असतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. यासाठी तेलकट पदार्थ खाणे टाळा.

2. रात्री उशिरा झोपणे

रात्री उशिरा झोपणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या मूडवर परिणाम होतो तसेच विचार करण्याची क्षमता बदलते. अशावेळी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा.

3. सतत बसून राहाणे

सतत एकाच जागी बसून राहिल्याने तुम्ही लठ्ठ होऊ शकता. त्यामुळे फोनवर बोलताना बसून बोलू नका. चालता चालता फोनवर बोला यामुळे चयापचय गती वाढेल. पचनक्रिया वेगवान होईल. जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून तुमचे संरक्षण होईल.

4. उभे राहून पाणी पिणे

उभे राहून पाणी पिणे एक वाईट सवय आहे. ज्याकडे आपण लक्ष देत नाही. उभे राहून पाणी पिणे टाळण्याचा प्रयत्न करा. नेहमी बसून पाणी प्या. याशिवाय दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नवीन वर्षात तुमच्या या सवयी बदला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT