सद्धा न्यू इयरचा प्लान सगळेच धुमधडाक्यात तयार करत आहेत. सगळ्यांच्या पिकनिकचे प्लान आता तयार झाले आहेत. काही जण मोठ्या बजेटनुसार त्यांच्या फॅमिलीसोबत परदेशात जाण्याचे प्लॉन करत आहेत. पण तुमचं बजेट जर कमी असेल तर तुम्ही भारतातल्याच काही ठिकाणांना भेट देऊ शकता. चला तर जाणून घेऊ या ठिकाणांची यादी.
बारामोटेची विहीर
तुम्ही सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात ३०० वर्ष जुन्या असलेल्या गावात फिरण्याचा प्लान करू शकता. इसवी सन १७१९ ते १७२४ या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई यांनी ती विहीर बांधल्याचं सांगितलं जातं. त्या विहीरीचे अनेक रंजक इतिहास आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सातारा शहर फिरू शकता.
पन्हाळा कोल्हापूर
कोल्हापूर मधील पर्यटनासाठी सुप्रसिद्ध पन्हाळा हे ठिकाण न्यू इयर प्लानसाठी सगळ्यात उत्तम डेस्टीनेशन आहे. पन्हाळा हा कोल्हापूर शहरापासून २० किमी अंतरावर आहे. तिथे तुम्ही पन्हाळ्यावर पर्यटनासाठी गेलात तर फॅमिलीसोबत जेवणाचा बेत करायला विसरू नका. तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी हे शहर एक उत्तम पर्याय आहे.
मसाई पठार
कोल्हापूर जिल्हातील पन्हाळा गडाच्या शेजारीच असणारे मसाई पठार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. न्यू इयरला तुम्ही या सुंदर ठिकाणी तुमच्या फॅमिलीसोबत जाण्याचा प्लान करू शकता. पन्हाळ्यापासून हे शहर ७ किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळा आणि मसाई पठार तुम्ही एकत्र एका दिवशी पाहू शकता.
राधानगरी अभयारण्य
प्रत्येक ऋतूत हिरवळीने नटलेले राधानगरी अभयारण्य पर्यटक मोठ्या संख्येने पाहायला जात असतात. याचाच एक भाग म्हणजे दाजीपूर म्हणून याला दाजीपूर अभयारण्यसुद्धा म्हणतात. हे अभयारण्य कोल्हापूरपासून ५५ कि.मी अंतरावर आहे. तुम्ही इथे एस टी बसच्या साहाय्याने सहज जावू शकता.