Christmas Wishes : यंदाच्या ख्रिसमसला तुमच्या मित्राला पाठवा खास शुभेच्छा, पाहा Top 10 मेसेज

Christmas Messages : आपण नेहमीच काम आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातो. ज्यामुळे आपल्याला आपल्या मित्रांसोबत वेळच घालवता येत नाही.
Christmas Wishes
Christmas Messagescanva
Published On

आपण नेहमीच काम आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातो. ज्यामुळे आपल्याला आपल्या मित्रांसोबत वेळच घालवता येत नाही. त्यामुळे या ख्रिसमसला वेळ काढून मित्रांना भेटा. शक्य नसल्यास त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा नक्की पाठवा. पुढे आम्ही शुभेच्छांची यादी दिली आहे.

१. तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

२. वात्सल्याचा सुंगध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशुला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

३. नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिसमस! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

४. ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

५. आला पहा नाताळ, घेऊनी आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे प्रभुती कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.

Christmas Wishes
National Farmers Day : किसान दिवस विशेष: हरित क्रांतीच्‍या दिशेने महिला शेतकऱ्यांची वाटचाल

६. ख्रिसमस आनंददायी वातावरणाने आपले जीवन तेजस्वी आणि प्रकाशमान होत जावो. याच आपणाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

७. लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून सांता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो...पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं, आपल्या आयुष्यातील खरा सांता तर फक्त आपला बापचं असतो. तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

८. आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार

लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार

तुम्हालाही आनंदाचा जावो हा ख्रिसमसचा सण वारंवार

९. आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र

सुख, समृद्धी घेऊन येवो

आनंद नेहमीच द्विगुणीत होवो,

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. मी कार्ड पाठवत नाही

मी फुलं पाठवत नाही,

फक्त मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो,

ख्रिसमस आणि नविन वर्षाच्या

मी शुभेच्छा पाठवत आहे.

Christmas Wishes
Winter Weight Loss : थंडीतून सकाळी जीमला जायचा कंटाळा येतो? मग 'या' टीप्स वापरून करा वजन कमी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com