Secret Santa Gift Idea : ऑफिसमध्ये सीक्रेट सांता खेळताय? मग एकदा 'या' गिफ्ट्स आयडिया नक्की बघा

Office Christmas Celebration Tips : ख्रिसमस जवळ आला आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये सीक्रेट सांताचा गेम खेळला जातो. विशेषत: ऑफिसमध्ये असे खेळ खेळले जात असतात. अशावेळी गिफ्ट काय द्यावं याबद्दल गोंधळ उडतो.
Secret Santa Gift Idea
Secret Santa Gift IdeaSaamTv
Published On

डिसेंबर महिना सुरू झाला की सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे वेध लागलेले असतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा सण असला तरी आता शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला सर्वांचीच पसंती मिळताना दिसत असते. त्यातही कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आता मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा होताना दिसतो. त्यातही बऱ्याच ठिकाणी 'सीक्रेट सांता' गेम खेळला जातो. यात ऑफिसमधील आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणाचे तरी आपण सीक्रेट सांता असतो, तर आपलं कोणीतरी सीक्रेट सांता असतं. अशावेळी काय गिफ्ट द्यायचे हे समजत नाही, आपण दिलेलं गिफ्ट आवडेल का? ते योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.

शाळा, कॉलेज, ऑफिसमध्येही ख्रिसमस सेलिब्रेशन असतं. मग ख्रिसमस सेलिब्रेशन म्हणजे सीक्रेट सांता आलाच. सीक्रेट सांता गेम खेळताना अशा सहकाऱ्याचे नावं येतात ज्या सहकाऱ्याचे नाव तुम्हाला येते, त्याला अनेकदा तुम्ही फार ओळखत नसतात. अशा सहकाऱ्याला काय भेट वस्तु द्यावी याबद्दल आम्ही आज तुम्हाला काही गिफ्ट आयडिया सांगणार आहे. या यादीमुळे तुम्हाला सीक्रेट सांता गिफ्ट निवडताना मदत होईल. तसंच तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही चांगल्या वापरण्यायोग्य भेटवस्तू देऊन खूश करू शकाल.

पुरुष सहकाऱ्यांना देण्यासाठी गिफ्ट्स आयडिया

१) ब्लूटूथ हेडफोन

२) स्मार्ट वॉच

३) ब्लूटूथ स्पीकर

४) हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर

५) ट्रिमर मशीन

६) क्रिएटिव्ह डेकोरेटिव्ह लाईट्स

७) मॅन गिफ्ट हॅम्पर

८) वॉच

९) फॅन्सी वॉलेट

१०) डिओ परफ्युम

११) गॉगल्स

१२) मोबाईल कव्हर

१३) फॅन्सी टी-शर्ट, हुडी

Secret Santa Gift Idea
New Year Gifts: जवळच्या व्यक्तीचं न्यू इयर खास बनवायचं आहे? मग द्या 'हे' स्पेशल गिफ्टस

महिला सहकाऱ्यांना देण्यासाठी गिफ्ट्स आयडिया

तुम्हाला सीक्रेट सांता म्हणून महिला सहकाऱ्यांचं नाव आलं असेल तर अशावेळी त्यांना काय आवडेल याबद्दल अनेकवेळा गोंधळ उडतो. पण महिलांसाठी मेकअपपासून, ज्वेलरी, कपड्यांपर्यंत अनेक भेटवस्तू किंवा गिफ्ट्स देण्यासारखे पर्याय उपलब्ध असतात.

Secret Santa Gift Idea
Christmas gift ideas : प्रियजनांना ख्रिसमस गिफ्ट देण्याचा विचार करताय? कधीच देऊ नका 'ही' वस्तू, होतील गंभीर आजार

१) मॅनिक्युअर पेडीक्योर किट

२) स्किन केअर किट

३) वॉच किंवा ब्रेसलेट

४) नेकलेस किंवा इयरिंग्स

५) कॅप

६) हॅण्डबॅग किंवा क्लच बॅग

७) ड्रेस, फॅन्सी कुर्ता, स्कार्फ

८) मेकअप किट

Secret Santa Gift Idea
Mufasa - The Lion King : मुफासाची जोरदार कमाई सुरु तर नाना पाटेकरांच्या वनवास पडला मागे !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com