Christmas 2024 : ख्रिसमस एन्जॉय करायचा आहे? मग मुंबईतील 'या' पाच चर्चला एकदा भेट द्याच

Top churches in Mumbai : ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी प्रभु येशूचा वाढदिवस साजरा करतात.
Top churches in Mumbai for Christmas
Christmas 2024google
Published On

ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी प्रभु येशूचा वाढदिवस साजरा करतात. हा सण ख्रिश्चन धर्मीयांसाठी वर्षातील सर्वात मोठा सण आहे. हा सण आज भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मानुसार, या दिवशी येशूचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणूनच लोक आज चर्चमध्ये जाऊन देवाची प्रार्थना करतात.

ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांच्या मते, येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीचा उद्धार करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. बेथलेहेम गावातील एका गोठ्यात त्यांचा जन्म झाला होता. ख्रिसमसचा मुख्य संदेश म्हणजे प्रेम, दया, क्षमा आणि आशेचा प्रचार करणे. येशू ख्रिस्ताने मानवजातीला शांतता आणि मैत्रीचा संदेश दिला होता. ख्रिसमस हा कुटुंब, मित्र आणि समाजातील लोकांसोबत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा काळ आहे.

Top churches in Mumbai for Christmas
10 Minute Recipe : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा चाट; बनवण्यासाठी लागतील अवघी १० मिनिटं

चर्चमध्ये प्रार्थना, गाणी (कॅरोल्स), आणि सजावट यामुळे उत्सवाला विशेष रंगत येते. ख्रिसमसच्या काळात गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, भेटवस्तू देणे आणि दया दाखवणे या गोष्टींवर भर दिला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला चर्च रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते. आजूबाजूला आनंदाचे वातावरण असते. यासोबतच लोक घराघरात आणि चर्चमध्ये ख्रिसमस ट्री लावतात. हा सण भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी चर्चमध्ये येशूला प्रार्थना करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते.

ख्रिसमस साजरा करण्यासाठी मुंबईतले प्रसिद्ध चर्च

माऊंट मेरी चर्च

माऊंट मेरी चर्च बांद्रा भागात आहे आणि हे खूप प्राचीन आहे. या चर्चचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे होणारा वार्षिक माऊंट मेरी फेअर. ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात.

सेंट थॉमस कॅथेड्रल

सेंट थॉमस कॅथेड्रल हे मुंबईतले पहिली चर्च मानले जाते. 1718 साली बांधलेली हे चर्च ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

होली नेम कॅथेड्रल

होली नेम कॅथेड्रल चर्च कुलाबामध्ये स्थित असून 1905 साली बांधण्यात आली आहे. त्या चर्चची गॉथिक शैलीतील रचना आणि रंगीत काचकाम आकर्षक आहे.

ग्लोरिया चर्च

ग्लोरिया चर्च हे 1548 साली बांधली गेले होते आणि नंतर 1913 मध्ये भायखळ्यात पुन्हा उभारले गेले. ते जुने पोर्तुगीज चर्च म्हणून ओळखले जाते.

सेंट मायकेल चर्च

सेंट मायकेल हे चर्च महिममध्ये असून ते पवित्र देवदूत मायकेल यांना समर्पित आहे. येथे प्रार्थनेसाठी प्रचंड लोक गर्दी करतात. हे एक सगळ्यात प्रसिद्ध चर्च पैकी एक मानले जाते.

Written By : Sakshi Jadhav

Top churches in Mumbai for Christmas
Reduce Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ; औषधांपेक्षा 'हा' घरगुती उपाय ठरेल फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com