नवीन वर्षाची चाहुल लागताच आपल्याला वेध लागतात ते फिरण्याचे. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी आपण फिरण्याचे प्लान करतो. अशातच सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नव्या ठिकाणांचा शोध घेत असतात.
फिरायला (Travel) जाण्यासाठी आपण फ्लाइट, ट्रेन किंवा हॉटेल्स बुक करतो. आपल्याला ही ट्रिप बजेटमध्ये हवी असते. अनेकदा ही ट्रिप तुम्हाला अधिक खर्चात पाडते. पण आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीमध्ये हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च करु शकता. कसे ते जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर तुम्हालाही फिरायला जायचे असेल तर क्रेडिट कार्ड बनवाव लागेल. या क्रेडिट कार्डच्या माध्यामातून तुम्ही फ्रीमध्ये (Free) हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च करु शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड (Credit Card) रिवॉर्ड पॉइंट्स लॉयल्टी प्रोगाममध्ये रुपातंरित करावे लागेल.
Marriott Bonvoy, Accor Live Limited (ALL), Accor Plus, Taj Epicure आणि Club ITC सारखे हॉटेल्स रिवॉर्ड पॉइंट्स लॉयल्टी कार्यक्रमांतर्गत अनेक फायदे देतात. याचा आणखी फायदा कसा होतो. हे कार्ड कसे बनवायचे हे जाणून घेऊया
1. हॉटेल्ट लॉयल्टी प्रोग्रामचे फायदे
क्रेडिट कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी सूट मिळेल.
खाण्यापिण्यावर, स्पा आमि लाउंज वापरण्यासाठी विशेष सवलत मिळेल.
लवकर चेक इन आणि उशिरा चेक आउट करण्याची संधी
हॉटेलच्या जाहिराती, सदस्य आमंत्रणे, विशेष डील आणि ऑफर मिळेल.
रुम बुकिंग, जेवण आणि इतर अनेक गोष्टींसाठी पेमेंटमध्ये रिवॉर्ड पॉइंट मिळेल.
जर तुम्हाला या हॉटेल्सह इतर अनेक सुविधा हव्या असतील तर ते तुमच्या क्रेडिट कार्डवर अवलंबून आहे. तुमचे कार्ड सिल्व्हर, गोल्ड किंवा प्लॅटिनम कशावर अवलंबून आहे यावर ठरते.
2. क्रेडिट कार्ड कसे निवडाल?
हॉटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी काही बँकाची पार्टनरशीप असते. जे ग्राहकांना क्रेडिट कार्ड पॉइंट्स हॉटेल लॉयल्टी प्रोग्राममध्ये रुपांतरित करण्यास मदत करते.
HDFC Bank - Accor Live Limitless (ALL), Wyndham Rewards आणि IHG One Rewards
अॅक्सिस बँक - Accor Live Limitless (ALL), Marriott Bonvoy, Wyndham Rewards, IHG One Rewards, Club ITC
अमेरिकन एक्सप्रेस - मॅरियट बोनवॉय
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.