टाटा मोटर्सने त्यांच्या पॉवरफुल SUV कार टाटा हॅरियर आणि टाटा सफारीच्या नवीन अपडेटेड व्हराजन लॉन्च केले आहेत. कंपनीने हॅरियरची प्रारंभिक किंमत 15.49 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवली आहे.
तर सफारी 16.19 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या दोन्ही कार्समध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. तसेच यात अनेक सेगमेंट फस्ट फीचर्सही कंपनीने दिले आहेत. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
सात मॅन्युअल व्हेरिएंट
Tata Harrier सात Smart, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Fearless and Fearless+ मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या टॉप व्हेरिएंट 24.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. हॅरियरची ऑटोमॅटिक 'डार्क एडिशन' चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, ज्याची किंमत 19.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. (Latest Marathi News)
कंपनी सात मॅन्युअल ट्रिममध्ये टाटा सफारीची फेसलिफ्ट व्हर्जन ऑफर करत आहे. याचा टॉप व्हेरिएंट 25.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असेल. कारच्या ऑटोमॅटिक ‘डार्क एडिशन’ची एक्स-शोरूम किंमत 20.69 लाख रुपये असेल. टाटाने आपल्या नवीन हॅरियर आणि सफारीच्या लूकमध्ये अनेक बदल केले आहेत. या एसयूव्ही आता पूर्वीपेक्षा अधिक मस्क्युलर लूकमध्ये असतील.
दोन्ही कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक LED DRL आहेत. यात रनिंग लाइट एलईडी लाइट बार आणि स्लिमर टेल लॅम्प क्लस्टर आहे. या नवीन SUV गाड्यांना सुरक्षिततेसाठी अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देण्यात आली आहे. कारला अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 7 एअरबॅग्ज, नवीन गियर नॉब मिळतात. गीअर नॉबला 'स्मार्ट ई-शिफ्टर' बसवले आहे. कारमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि टच-बेस्ड कंट्रोल पॅनल देण्यात आले आहे.
12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
टाटाने नवीन कार्समध्ये ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये 2.0-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिन आहे. जे 168 bhp चा पॉवर आणि 350 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. कारमध्ये 10 स्पीकर JBL ऑडिओ सिस्टीम बसवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.