Petrol Diesel Price SaamTV
लाईफस्टाईल

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर काय?

आज सलग १९ व्या दिवशी देशामध्ये पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर आहेत

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: आज सलग १९ व्या दिवशी देशामध्ये पेट्रोल- डिझेलचे भाव (Petrol Diesel price today) स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलचे नवे भाव जारी केले आहेत. देशभरामध्ये ७ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) भाव स्थिर आहेत. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मिळालेल्या भावानुसार, आज देशात सर्व शहरांतील पेट्रोल- डिझेलचे भाव स्थिर आहेत. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या भावानुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे भाव सध्या १२०.५१ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल १०४.७७ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत (Delhi) पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल ९६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हे देखील पहा-

इंडियन ऑईलने जारी केलेल्या भावानुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोल १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल १०६ डॉलरच्या (Crude Oil price) पातळीवर बंद झाले होते.

२१ एप्रिल दिवशी भारतीय बास्केटसाठी कच्च्या तेलाची सरासरी भाव १०६.१४ डॉलर होते. २० एप्रिल दिवशी सरासरी भाव प्रति बॅरल १०५.५१ डॉलर होते. ही माहिती PPAC च्या वतीने देण्यात आली. ११ एप्रिल दिवशी भाव प्रति बॅरल ९७.८२ डॉलर होती. अशाप्रकारे, गेल्या १० दिवसांत क्रूड बास्केटची भाव ८.३२ डॉलरने वाढले आहे. सरासरी भावातील ही वाढ सतत सुरू आहे. परंतु, तेल कंपन्यांनी ६ एप्रिलपासून भावात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे ४ नोव्हेंबर २०२१ पासून २१ मार्च २०२२ पर्यंत देशात पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर होते. साडेचार महिन्यांनी किमतींमध्ये बदल झाला होता. ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल १० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. यानंतर गेल्या १९ दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)

मुंबई १२०.५१ रुपये १०४.७७ रुपये

पुणे १२०.६० रुपये १०३.२८ रुपये

नाशिक १२०.०२ रुपये १०२.७३ रुपये

परभणी १२३.५१ रुपये १०६.०८ रुपये

औरंगाबाद १२०.६३ रुपये १०३.३२ रुपये

कोल्हापूर १२०.६४ रुपये १०३.३५ रुपये

नागपूर १२१.०३ रुपये १०३.७३ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT