वृत्तसंस्था: दिल्ली सरकारने आज शाळांसाठी कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहे. थर्मल स्कॅनिंगशिवाय विद्यार्थी (Students) आणि कर्मचाऱ्यांना शाळेच्या (school) आवारात प्रवेश देऊ नये, असे सांगितले आहे. तसेच पालकांना त्यांच्या मुलांना कोरोना (Corona) विषाणूची लागण झाल्याचे आढळल्यास त्यांना शाळेत न पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सरकारने (government) असेही म्हटले आहे की, 'विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वस्तूंची देवाणघेवाण टाळण्याची सूचना देण्यात आली आहे.
हे देखील पहा-
दिल्ली सरकारने ही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली
-पालक शिक्षक सभा बंद ठेवण्याबाबत सल्ला
-मुलांना जेवण आणि पुस्तके शेअर करू नका असा सल्ला
-कोविड लक्षणांची सतत तपासणी
-लक्षणे दिसू लागताच अधिकाऱ्यांना माहिती द्या
-प्रत्येक क्वारंटाइन रूम तयार
विशेष म्हणजे, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता की, आता राजधानीतील शाळा कोरोनामुळे बंद केल्या जाणार नाहीत, तर नवीन कार्यप्रणाली तयार केली जाईल. या SOP च्या आधारे शाळांमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी केली जाईल. याअंतर्गत दिल्ली सरकारने आज सात कलमी एसओपी जारी करण्यात आली आहे.
दिल्लीत कोरोनाचा परिस्थिती
राष्ट्रीय राजधानीत गेल्या काही दिवसांपासून (Covid) कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत (Delhi) संसर्गाची 965 नवीन प्रकरणे समोर आली. बुधवारी कोरोनाचे 1,009, मंगळवारी 632 आणि सोमवारी 501 रुग्ण आढळले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.