Mercedes-Benz CLA Concept Saam Tv
लाईफस्टाईल

Mercedes-Benz CLA Concept: मर्सिडीजची CLA कार लवकरच बाजारात! सिंगल चार्जवर 750 KM जबरदस्त ड्रायव्हिंग रेंज

Mercedes Electric Vehicle Price : Mercedes Benz ने नुकतच एका नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mercedes CLA Concept Electronic Vehicle Specification :

Mercedes Benz ने नुकतच Munich Auto Show मध्ये एक नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. या कारमध्ये नवीन CLA संकल्पना वापरली आहे. टेस्ला मॉडेल 3 सारख्या लांब पल्ल्यांच्या मॉडेल्सला जागतिक बाजारपेठेत नेण्याचे CLA संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. सीएलए संकल्पना एका चार्जवर 750 किलोमीटरपेक्षा जास्त रेंजचे आश्वासन देते. हे मॉडेल 3 पेक्षा जास्त आहे.

या इलेक्ट्रीक वाहनाच्या संकल्पनेची सरासरी कार्य करण्याची क्षमता ही 12KWH प्रति 100 किमी आहे. कारच्या जलद चार्जिंगमुळे केवळ 15 मिनिटांत 400 किलोमीटरपर्यंतची रेंज जोडण्याची दावा करते.

1. इलेक्ट्रिक कार डिझाइन

CLA संकल्पना असलेली EV डिझाइन ही जर्मन ऑटो जायंटच्या इलेक्ट्रीक कारच्या डिझाइनचे प्रदर्शन करते. त्याच्या ICE आवृत्तीवर आधारित, इलेक्ट्रीक कारची लांबी ४.७४ मीटर तर रुंदी १.९५ मीटर आहे. CLA संकल्पना 21-इंच अॅलॉय चाकांच्या सेटवर उभी आहे.

2. इलेक्ट्रिक कार इंटेरियर

सीएलएच्या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये MBUX सुपरस्क्रीन मिळते. ही स्क्रीन डॅशबोर्डच्या संपूर्ण रुंदीमध्ये पसरते. यात मिनी एलईडी तंत्रज्ञान आणि थ्रीडी ग्राफिक्स देण्यात आले आहे. तसेच यात तीन वेगवेगळ्या स्क्रीन आहेत. इन्फोटेक सिस्टीमसाठी, मर्सिडीजने विकसित केलेल्या नवीन MB-OS ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित आहे. तसेच Nvidia प्रोसेसर आहे. जे संपूर्ण कारला नवीन लूक देते.

ही कार चीनसारख्या बाजारपेठेत टेस्ला आणि बीवायडीशी स्पर्धा करणार आहे. सीएलए संकल्पनेवर आधारित ही अशी इलेक्ट्रिक कार असेल जी यूएस आणि चीनयेथील निर्मित ईलेक्ट्रॉनिक कारला टक्कर देईन.

3. कधी होणार Mercedes EQE इलेक्ट्रीक SUV लॉन्च

मर्सिडिज या महिन्याच्या अखेरीस EQE इलेक्ट्रीक SUV लॉन्च करणार आहे. EQS आणि EQB व्यतिरिक्त हे भारतातील तिसरे इलेक्ट्रिक वाहन असेल. EQE 90.6 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल. ज्यामुळे ते प्रति चार्ज सुमारे 500 किमीची रेंजची परवानगी देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

चमत्कारच! मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यापूर्वीच महिलेनं केलं असं काही, सगळे हादरले!

Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

Farah Khan: तुम्ही आणि सलमान खान एक सारखे...; फराह खानने का केली बाबा रामदेवची सलमान खानशी तुलना

SCROLL FOR NEXT