Kotak Mahindra Bank : कौटुंबिक व्यवसायात हात बसला नाही; लहान खोलीत सुरू केला नवा व्यवसाय; आज आहेत देशातील सर्वात मोठे बँकेचे मालक

Uday Kotak Journey : उदय महिंद्रांची कोटक महिंद्रा बँक उभारण्यात खूप मोलाचा वाटा आहे.
Uday Kotak Journey
Uday Kotak JourneySaam Tv

Kotak Mahindra Bank CEO Success Story

खासगी क्षेत्रातील विश्वासू आणि नामाकिंत बॅंकामध्ये 'कोटक महिंद्रा बँके'चे नाव अग्रेसर आहे. खाजगी बँकांमध्ये खाते उघडायचे म्हटले तर लोक सर्वात आधी कोटक महिंद्रा बँकेला प्राधान्य देतात. याच बँकेचे संस्थापक उदय कोटक महिंद्राची कंपनीच्या यशाची एक कहानी आहे. कौटुंबिक व्यवसायात जम न बसल्याने स्वतः ची कंपनी उघडली. अन् आज ही कंपनी सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ कोटक महिंद्रानी गेल्या आठवड्यात शनिवारी, २ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचे ही बँक उभारण्यात खूप मोलाचा वाटा आहे. ३८ वर्षापूर्वी कौटुंबिक व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय सुरू केला.

Uday Kotak Journey
Shri Krishna Janmashtami 2023 : जरा मटकी संभाल ब्रिजवाला... भारतात या ठिकाणी दहीहंडीचा सण जल्लोषात केला जातो साजरा, आजच भेट द्या

१९८५ मध्ये कोटक महिंद्रा बँकेची सुरूवात झाली. उदय कोटक त्यावेळी फक्त २६ वर्षाचे होते. केवळ १३ कर्मचाऱ्यांसह ३०० स्क्वेअर फुटांच्या कार्यालयात ही बँक सुरू केली. ही बँक देशातील तिसरी सर्वात मोठी खासगी बँक बनली आहे. ६० लाखांच्या भांडवलात ही बँक सुरू करण्यात आली.

उदय कोटक यांचा प्रवास

उदय कोटक यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे सर्व कुटुंब कापूस व्यवसायात होते. त्यांनी कौटुंबिक व्यवसायात आपल नशीब आजमावलं. परंतु त्यात त्यांचा जम काही बसला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी एमबीए करताना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी छोटी फायनान्स कंपनी सुरू केली.

१९८५ मध्ये उदय कोटक यांनी कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्सची सुरवात ६० लाख रुपयांच्या भांडवालाने केली. उदय कोटक आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे चांगले मित्र होते . आनंद महिंद्रानी कोटक कॅपिटल मॅनेंजमेंटमध्ये पैसे गुंतवले होते. यानंतर कंपनीचे नाव बदलून 'कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड' ठेवण्यात आले.

Uday Kotak Journey
Apple New Series Booking Date : भारतात या दिवशी iPhone 15 सीरीजचा पहिला सेल येणार, कंपनीचा प्लान काय? वाचा सविस्तर

असा झाला कंपनीचा विस्तार

स्वतः चा व्यवसाय सुरू केल्यानंतर उदय कोटक यांनी स्टॉक बँकिंग, इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ वाढवला. १९९८ मध्ये उदय कोटक यांनी महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केला.

कोटक महिंद्रा बँकेने बँकिग परवाना मिळवून इतिहास रचला

'कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड'ला २००३ मध्ये RBI कडून बँकिग परवाना मिळाला. उदय महिंद्राच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट ठरला. बँकिग परवाना मिळवणारी भारतीय कॉर्पोरेटमधील ही पहिली संस्था ठरली.

अवघ्या ११ वर्षात कोटक महिंद्रा देशातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक कंपनी बनली. सध्या त्याचे मार्केट कॅप ३.५० कोटी रुपये आहे. २०१९ मध्ये सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंच्या यादीत उदय कोटक यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. मीडिया रिपोर्टनुसार, ते देशातील सर्वात श्रीमंत बँकर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १,२०,०२० कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com