iPhone Series Booking Date: भारतात या दिवशी iPhone 15 सीरीजचा पहिला सेल येणार, कंपनीचा प्लान काय? वाचा सविस्तर

iPhone New Series : लॉन्चच्या आधीपासूनच अफवांमार्फत फीचर्सच्या माहिती मिळत होती, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांमुळे हे डिव्हाइस खूप चर्चेत आहे.
Apple New Series Booking Date
Apple New Series Booking DateSaam Tv

iPhone Series Booking Date :

iPhone 15 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या रिवोल्यूशनरी बदलाबाबतचा अंदाज, ज्यामध्ये पहिले नाव त्याच्या चार्जिंग पोस्टवरून येते. लॉन्चच्या आधीपासूनच अफवांमार्फत फीचर्सच्या माहिती मिळत होती, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांमुळे हे डिव्हाइस खूप चर्चेत आहे.

सध्या, कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या वार्षिक निमंत्रणाची तारीख जाहीर केली आहे, ज्याला वंडरलस्ट असे नाव दिले आहे. अशी अपेक्षा आहे की आयफोन 15 सीरिज लॉन्च (Launch) या कार्यक्रमाचा एक भाग असेल, ज्यामध्ये कंपनी या सीरिजमधील चार आयफोन लॉन्च करू शकते – iPhone 15 , iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max.

Apple New Series Booking Date
Apple New Series : iPhone चा ग्राहकांना दणका! लॉन्च होण्यापूर्वीच किंमत ऐकूण डोकं फिरेल, वाचा सविस्तर

सध्या, अशी माहिती मिळत आहे की कंपनी आपल्या डिव्हाइसची विक्री त्याच्या ग्लोबल लॉन्चच्या काही दिवस आधी सुरू करेल.

कार्यक्रम कधी सुरू होईल?

'वंडरलस्ट' नावाचा अ‍ॅपलचा (Apple) वार्षिक कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियाच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल. जर आपण लोकेशनबद्दल बोललो तर हा कार्यक्रम क्युपर्टिनो येथील अ‍ॅपल पार्क येथे होणार आहे.

याशिवाय जे या इव्हेंटमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत ते Apple.com आणि Apple TV अ‍ॅपवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करू शकतात .

Apple New Series Booking Date
Google Pixel 8 Series: गुगलची मोठी घोषणा, या दिवशी लॉन्च होणार Pixel 8 सीरीज, iPhone 15 ला देणार टक्कर?

लॉन्च होताच फोन विक्रीवर येतील का?

नवीन मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दिसून आले आहे की कंपनी (Company) लॉन्च सोबतच आपली नवीनतम स्मार्टफोन सीरीज iPhone 15 विक्रीवर आणू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे की ही सीरीज जागतिक लॉन्च दरम्यान किंवा त्यानंतर काही दिवसांनी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार माहिती मिळाली आहे की या सीरीजचे सर्व युनिट्स अ‍ॅपल असेंबलर फॉक्सकॉनच्या चेन्नईच्या फॅक्टरीमध्ये बनवले गेले आहेत, ज्यामुळे ते देशात उपलब्ध करणे सोपे होणार आहे.

याचा अंदाज वर्तवला जात आहे कारण आयफोन 14 लॉन्च झाला तेव्हा भारतात बनवलेले युनिट्स 10 दिवसांच्या आत विक्रीसाठी पाठवण्यात आले होते. आता यात कितपत तथ्य आहे हे पाहायचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com