Instagram Profile Update Saam Tv
लाईफस्टाईल

Instagram New Feature: इंस्टाचे नवीन फीचर्स ! आता युजर्सना बायोमध्ये करता येणार 5 लिंक्स अॅड, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

Instagram Bio New feature: ट्रेन किंवा प्रवासात आपल्याला कंटाळा आल्यावर आपण Instagram वर रिल्स पाहण्यात वेळ घालवतो.

कोमल दामुद्रे

Instagram New Features : आपल्यापैकी बरेच लोक Instagram चा वापर करतात. ट्रेन किंवा प्रवासात आपल्याला कंटाळा आल्यावर आपण Instagram वर रिल्स पाहण्यात वेळ घालवतो. परंतु, त्यातच कन्टेंट तयार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

मेटाने Instagram मध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे, जेणेकरुन वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलमध्ये एकापेक्षा जास्त लिंक जोडू शकतील. इंस्टाग्रामने आपल्या वापरकर्त्यांना प्रोफाइलमध्ये फक्त एक लिंक जोडण्याची परवानगी दिली होती पण आता वापरकर्त्यांना अधिक लिंक जोडण्याची संधी दिली आहे.

या लिंक्स जोडताना पूर्वी काही थर्ड पार्टीचा वापर करावा लागत होता. मात्र, आता इन्स्टाग्रामचे नवीन फीचर आल्यानंतर यूजर्सला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपवर अवलंबून राहावे लागणार नाही. नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या Instagram प्रोफाइलमध्ये पाच लिंक जोडण्याची परवानगी देईल. चला जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. Instagram चे नवीन फीचर्स

Instagram ने त्याच्या अधिकृत खात्याद्वारे फोटो (Photo) व व्हिडिओ (Video) शेअरिंग प्लॅटफॉर्मवरुन घोषणा केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आता वापरकर्त्यांना एकपेक्षा अधिक म्हणजे पाच लिंक जोडता येतील. जर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलच्या बायोमध्ये एकापेक्षा जास्त लिंक जोडायच्या असतील, तर आम्ही त्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो कराव्या लागतील

2. बायोमध्ये अधिक लिंक्स कशा अपडेट कराल

  • स्मार्टफोनवर Instagram अॅप उघडा.

  • प्रोफाइलवर गेल्यानंतर खालच्या बाजूला उजवीकडे असलेल्या प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.

  • स्क्रीनवर प्रोफाइल संपादित करा वर टॅप करा.

  • नंतर तुमच्या वेबसाइटसाठी URL जोडण्यासाठी बाह्य दुवे जोडा वर टॅप करा.

  • स्वीकार (Accept) वर टॅप करा.

  • नंतर तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा स्वीकार करा वर टॅप करा.

3. iOS अॅपवर लिंक्स कसे जोडायचे?

  • तुमच्या iPhone वर Instagram उघडा.

  • तळाशी उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.

  • स्क्रीनच्या शीर्षस्थानी प्रोफाइल संपादित करा वर टॅप करा.

  • आता दुव्यावर टॅप करा, नंतर तुमच्या वेबसाइटसाठी URL जोडण्यासाठी बाह्य दुवे जोडा वर टॅप करा.

  • नंतर तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी टॅप करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

SCROLL FOR NEXT