Vastu Shastra SAAM TV
लाईफस्टाईल

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Vastu tips for gifting items to avoid: वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू भेट देणं अशुभ मानलं जातं. कात्री, घड्याळ, पर्स यांसारख्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. जाणून घ्या कोणत्या वस्तू भेट देणं टाळावं आणि सकारात्मक ऊर्जा कशी राखावी.

Surabhi Jayashree Jagdish

वास्तुशास्त्रामध्ये तुमचे जीवन चांगलं करण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्र केवळ दिशांच्या शुभ आणि अशुभ परिणामांबद्दलच माहिती देत ​​नाही तर त्यामध्ये जीवनाच्या इतर पैलूंबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. असंच वास्तू शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलंय ज्या तुम्ही भेट देऊ नये असं सांगितलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार, अशा गोष्टी भेट दिल्याने नकारात्मकता पसरण्याचा धोका असतो. या वस्तू कोणत्या आहेत त्या पाहूयात.

तीक्ष्ण वस्तू

तुम्ही चुकूनही धारदार वस्तू भेट देऊ नये. वास्तूनुसार, कात्री, चाकू किंवा इतर कोणतीही धारदार वस्तू भेट दिल्याने तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या वस्तू भेट दिल्याने नातेसंबंध तुटण्याचाही मोठा धोका असतो.

पर्स

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही कोणालाही पर्स किंवा पाकीट भेट देऊ नये. पर्स भेट दिल्याने केवळ नातेसंबंधच बिघडत नाहीत तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो.

घड्याळ

बरेच लोक घड्याळं एकमेकांना भेट देतात. परंतु वास्तूनुसार घड्याळ भेट देणं अशुभ मानण्यात येतं. घड्याळ भेट दिल्याने तुमच्या आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ते भेट देता त्या दोघांच्याही जीवनात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे, तुम्ही घड्याळ भेट देणं टाळावं.

बूट आणि चप्पल

तुम्ही कधीही बूट किंवा चप्पल भेट देऊ नये. वास्तूनुसार, बूट आणि चप्पल भेट देणं अशुभ मानले जाते. या वस्तू भेट दिल्याने प्रस्थापित नातेसंबंधसुद्धा बिघडू शकतात.

काळ्या वस्तू

काळा रंग नकारात्मक ऊर्जा निर्माण करतोय. त्यामुळे तुम्ही काळे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ नयेत. काळ्या वस्तू भेट दिल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडू शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT