Navratri Ghatasthapana Muhurat 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Ghatasthapana Muhurat 2023: शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

Navratri Utsav 2023 Date : शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2023 :

भारतात असे अनेक सण उत्सव आहेत जे मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते अनेकांना नवरात्रीचे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात ४ नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यातील २ मुख्य तर २ गुप्त असतात.

पहिली असते ती चैत्र नवरात्री तर दुसरी असते शारदीय नवरात्री. यातील शारदीय नवरात्री ही अधिक विशेष मानली जाते. या नवरात्रीला अनेक ठिकाणी दुर्गापूजा देखील म्हणतात. देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. अनेक ठिकाणी दुर्गा पंडाल उभारुन दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

नवरात्री ही तिथी नवदुर्गेच्या नऊ रुपांना समर्पित केली जाते. अनेक भक्तगण नऊ दिवस भक्तीभावाने श्रद्धेने उपवास (Vrat) करतात. यावर्षी शारदीय नवरात्री कधी सुरु होत आहे? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया

हिंदू पंचागानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. यावर्षी शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे तर २४ ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाईल.

1. घटस्थापना शुभ मुहूर्त

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही १४ ऑक्टोबर २०२३ला रात्री 11:24 पासून सुरू होईल तर 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 पर्यंत असेल. परंतु, उदय स्थितीनुसार घटस्थापना ही १५ ऑक्टोबरला केली जाईल.

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहू्र्त प्रतिपदेला १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

2. शारदीय नवरात्रौत्सव २०२३ तिथी

  • १५ ऑक्टोबर – देवी शैलपुत्री (प्रतिपदा तिथी)

  • १६ ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणी (द्वितीया तिथी)

  • १७ ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा (तृतीया तिथी)

  • १८ ऑक्टोबर – देवी कुष्मांडा (चतुर्थी तिथी)

  • १९ ऑक्टोबर – देवी स्कंदमाता (पंचमी तिथी)

  • २० ऑक्टोबर – देवी कात्यायनी (षष्ठी तिथी)

  • २१ ऑक्टोबर – देवी कालरात्री (सप्तमी तिथी)

  • २२ ऑक्टोबर – देवी महागौरी (दुर्गा अष्टमी)

  • २३ ऑक्टोबर – महानवमी (नवमी)

  • २४ ऑक्टोबर – दशमी तिथी (दसरा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT