Shardiya Navratri 2023 : नऊ दिवसांच्या या सणाला शारदीय नवरात्री असे का म्हणतात? जाणून घ्या कारण

Behind Story Of Know All Navratri : पापांचा नाश करणाऱ्या आणि भक्तांचे रक्षण करणाऱ्या मातेच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam Tv
Published On

Why Celebrate Shardiya Navratri :

पापांचा नाश करणाऱ्या आणि भक्तांचे रक्षण करणाऱ्या मातेच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मातेचे भक्त तिच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी कडक उपवास करतात. हा उपवास नऊ दिवस केला जातो.

मातेच्या आगमनाचा आनंद साजरा (Celebrate) करण्यासाठी लोक मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच दरवर्षी पितृपक्ष संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरू होतो.

हिंदू कॅलेंडर आणि पंचांगनुसार, भाद्रपद महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सर्वपित्री अमावस्या करून पितृ पक्षाची समाप्ती होते. त्यानंतर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.

यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होते आणि 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत असेल. तसेच 24 ऑक्टोबरला दशमी तिथीला विजयादशमीचा सण (Festival) साजरा केला जाईल. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, एका वर्षात चार नवरात्रोत्सव असतात.

Shardiya Navratri 2023
Navratri Festival: नवरात्रीत कालिका माता मंदिर २४ तास राहणार खुले; मंदिर समितीचा निर्णय

मातेचे स्वागत

मातेचे स्वागत करण्यासाठी काही भक्त घरी (Home) कलश बसवतात आणि दुर्गा देवीची पूजा करतात. त्याचबरोबर हा सण बंगाली लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. माता दुर्गेचा अवतार आणि राक्षसांचा नाश यासंबंधी अनेक पौराणिक कथां आहेत.

Shardiya Navratri 2023
Pitru Paksha 2023: पितृपक्षात कावळ्यासह 'या' प्राण्यांना पोटभर जेवण द्यायला विसरू नका

शारदीय नवरात्री नावामागील कारण

आश्विन महिन्यात देवी दुर्गा आणि महिषासुराचे युद्ध नऊ दिवस चालले म्हणून नवरात्री असे म्हणतात. तसेच दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणून दसरा साजरा केला जातो. अश्विन महिन्यात देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून नऊ दिवस उपासना आणि मनोभावनेने पूजा केली जाते. या महिन्यापासून शरद ऋतू सुरू होतो. त्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com