Navratri Festival: नवरात्रीत कालिका माता मंदिर २४ तास राहणार खुले; मंदिर समितीचा निर्णय

Nashik News : नवरात्रीत कालिंका माता मंदिर २४ तास राहणार खुले; मंदिर समितीचा निर्णय
Kalinka Mandir Nashik
Kalinka Mandir NashikSaam tv
Published On

नाशिक : नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. प्रत्येक मंदिरात गर्दी होत असते. (Nashik) त्या अनुषंगाने नवरात्रौत्सवात ग्रामदैवत कालिकामाता मंदिर दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय कालिका माता देवस्थान समितीने घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी (Navratri Festival) दर्शन घेणे सोयीचे होणार आहे. (Maharashtra News)

Kalinka Mandir Nashik
Maratha Aarakshan Andolan: थेट मोबाईल टॉवरवर चढून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा; आरक्षणासाठी ५० वर्षीय व्यक्तीचं आंदोलन

आगामी नवरात्रौत्सवात नाशिकचे ग्रामदैवत असलेलं कालिका माता मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं असणार आहे. नवरात्रौत्सव काळात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात ५१ सीसीटिव्ही कॅमेरांची नजर असेल. त्यासोबतच ४० महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक केली जाणार आहे.

Kalinka Mandir Nashik
Gondia News: जिल्ह्यातील जलाशय तुडूंब; रब्बी हंगामासाठी होणार फायदा

पेड दर्शनाचीही सुविधा 

नवरात्रीच्या काळात भाविकांना १०० रुपयात पेड दर्शनाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंदिरात भाविकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता यंदा कोजागरी पौर्णिमेपर्यंत देवीचा नवरात्रौत्सव सुरू ठेवण्याच संस्थानच नियोजन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com