शारदीय नवरात्रीचा महा उत्सव सुरू होणार आहे. नवरात्रीच्या काळात काही उपाय केल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतील. देवी मातेच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल आणि कामात यश मिळेल. त्यामुळे शारदीय नवरात्रीमध्ये लोक दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि उपाय करतात.
यंदा अश्विन महिन्यातील नवरात्र (Navratra) उद्या 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तुम्हालाही श्रीमंतकडे जाण्यासाठी हे उपाय ठरतील बेस्ट, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये हे काही खास उपाय करून पाहा घरात होईल पैशांची भरभराट.
नवरात्रीचे उपाय
सिंदूर वापरणे
नवरात्रीच्या नऊ दिवसांत घरामध्ये (Home) धन-संपत्ती आणि सुख-समृद्धी येण्यासाठी सिंदूर पूजेमध्ये वापरता येतो. पूजेच्या ताटात सिंदूर ठेवा असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
अखंड दिवा लावणे
नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड दिवा (Diva) लावणे खूप महत्वाचे आहे, जर तुम्हाला ते जमत नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायला सुरू करा. तसेच दिव्यात 4 लवंग टाका. दिवा आणि लवंगाची ही युक्ती तुम्हाला धनवान बनवेल.
जास्वंदाची फुले
जास्वंदाच्या फुलांचा वापर करून घरात सुख-समृद्धीचे दरवाजे उघडता येतात. नवरात्रीच्या पूजेच्या साहित्यांमध्ये जास्वंदाच्या फुलांचा समावेश केला जाऊ शकतो. जास्वंदाची फुले तुमच्या कपाटात किंवा मनी बॉक्समध्येही ठेवता येतात. नवरात्रीत केल्या जाणाऱ्या हवनातही या फुलांचा समावेश करतात.
या गोष्टी विकत घ्या
नवरात्रीच्या काळात स्वस्तिक, ओम, श्री, हत्ती, कलश, दिवा, गरूड बेल, पात्र, कमळ, श्रीयंत्र, मुकुट किंवा त्रिशूळ यांसारखी सोने किंवा चांदीची कोणतीही शुभ वस्तू खरेदी करा. नंतर दुर्गादेवीच्या चरणी ठेवा आणि 9 दिवस पूजा करा. शेवटच्या दिवशी ती वस्तू गुलाबी रेशमी कापडात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.