10 Days Durga Puja, Goddess Arrival on Elephant google
लाईफस्टाईल

Navratri 2025 : यंदा नवरात्र १० दिवसांची, देवीचे आगमन हत्तीवर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sharadiya Navratri : यंदा शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. देवीचे आगमन हत्तीवर होणार असून नवरात्र दहा दिवसांचे आहे. या सणाचे महत्व, पूजा व मुहूर्त जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • यंदा नवरात्र दहा दिवसांची असून २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

  • देवीचे आगमन हत्तीवर होणार आहे, ज्याला शुभ मानले जाते.

  • कलश स्थापनेसाठी तीन शुभ मुहूर्त जाहीर झाले आहेत.

  • अष्टमी ३० सप्टेंबर तर महानवमी १ ऑक्टोबर रोजी आहे.

महाराष्ट्रात अनेक सण मोठ्या धामधुमीत साजरे केले जातात. गणेशोत्सवानतंर आता नवरात्रीच्या सणाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. तर यंदा शारदीय नवरात्र २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, यंदा नवरात्र १० दिवसांची असणार आहे. दरवेळेस नवरात्र ९ दिवसांची असते, मात्र यावेळी तिथींच्या संयोगामुळे भक्तांना १० दिवस दुर्गापूजेचा आनंद घेता येणार आहे.

यावर्षी श्राद्ध कमी झाले असून नवरात्र वाढले आहे. त्यामुळे दुर्गा पूजेचे १० दिवस सगळ्यांसाठी लाभाचे ठरणार आहेत. हे अत्यंत शुभ मानले जाते. या वर्षी देवीचे आगमन हत्तीवरुन होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन सुख, समृद्धी आणि शुभ फलदायी मानले जाते.

हिंदू पंचांगानुसार, नवरात्र वर्षातून चार वेळा येते. त्यापैकी चैत्र आणि आश्विन नवरात्र मुख्य असून गृहस्थ भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात.आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २१ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० पासून सुरू होत आहे. सूर्योदय व्यापिनी तिथीनुसार नवरात्राची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी होईल. या वेळी अष्टमी पूजा व कन्या पूजन ३० सप्टेंबर रोजी होईल, तर महानवमी १ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.

कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६:०९ ते ८:१५, दुसरा ८:१५ ते १०:३६, तसेच अभिजित मुहूर्त ११:४९ ते १२:३८ असा सांगितला गेला आहे. नवरात्र पूजेत दुर्गा सप्तशती, दुर्गा स्तुती आणि दुर्गा चालीसाचे पठण विशेष फलदायी ठरते. नवरात्रात माता दुर्गा धन, धान्य, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT