Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Outfits 2023 : नवरात्रीत स्वस्तात फॅन्सी गरबा आउटफिट्स खरेदी करायचेत? मुंबईतील या मार्केटला नक्की भेट द्या

Garba Night Outfit : गुजरातसह महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागांमध्ये नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची विशेष पूजा केली जाते.

Shraddha Thik

Fancy Garba Outfits Market Places In Mumbai :

गणपती बाप्पाचा निरोप घेऊन आता भक्त नवरात्रीची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसात नवरात्री आहे, अनेकजण गणेशोत्सवप्रमाणे या सणासाठी खूप उत्सूक असतात. तसेच बाजारातही लगबग पहायला मिळते. यंदा शारदीय नवरात्री घटस्थापना 15 सप्टेंबर 2023पासून सुरू होणार आहे. या नवरात्रीत आदिशक्तीचा जागर केला जाणार.

गुजरातसह महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागांमध्ये नवरात्रीत देवीच्या विविध रुपांची विशेष पूजा (Pooja) केली जाते. तसेच गरबा आणि दांडिया खेळला जातो. हे पारंपारिक नृत्य गुजरातसह महाराष्ट्रात मुंबई आणि इतर ठिकाणी खेळला जातो. नवरात्रीत बऱ्याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. या कार्यक्रमांसाठी अनेकजण खास पारंपारिक कपडे परिधान करतात. तरूण धोती-कुर्ता किंवा पायजमा तसेच तरूणी घागरा-चोळी परिधान करतात आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटतात.

दरवर्षी नवरात्रीत तरुणींसाठी नवे ट्रेंडि घागरा चोळी आणि कुर्ता पायजमा/धोती बाजारात (Market) पहायला मिळतात. तसेच यंदा तुम्हालाही ट्रेंडि पण पारंपारिक कपडे परिधान करायचे असतील तर मुंबईतील या बाजारांना नक्की भेट द्या.

नवरात्रीसाठी फॅन्सी आउटफिट कॅरी करायचे असेल तर खाली दिलेले ही मार्केट्स ठरतील बेस्ट पर्याय

मंगलम मार्केट

विलेपार्लेमधील मंगलम मार्केट या ठिकाणी अनेक फॅन्सी आउटफिट्सची दुकानं आहेत. विशेषतः तरुणींसाठी इथे भरपूर फॅन्सी घागरा-चोळी उपलब्ध आहेत.

ठिकाण : दशरथलाल जोशी रोड, स्टेशनजवळ, LIC कॉलनी, सुरेश कॉलनी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई.

रेल्वेस्टेशन - विलेपार्ले.

वेळ : सकाळी 10 ते रात्री 8. रविवारी बंद असते.

जांभळी गल्ली

बोरिवलीतील जांभळी गल्ली फॅन्सी आउटफिट्ससाठी (Outfits) एक बेस्ट ऑप्शन आहे. मोक्ष मॉलच्या बाहेर तुम्हाला अनेक फेरीवाले गरब्यासाठी एकदम ट्रेंडी फॅशनेबल कपडे विकताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून तरुण-तरुणींसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला ज्वेलरीसाठीही अनेक पर्याय दिसतील.

ठिकाण : जांभळी गल्ली, मोक्ष मॉलच्या समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई.

रेल्वेस्टेशन - बोरिवली.

वेळ : सकाळी 10 ते संध्याकाळी 7.30

मंगलदास मार्केट

कपड्यांच्या ट्रेंडी फॅशनसाठी फेमस आणि मुंबईतील सगळ्यात जूने मार्केट म्हणजे मंगलदास मार्केट. या मार्केटमध्ये अनेक लहान उद्योग असलेले लोक येथे वस्तू खरेदी करून त्यांच्या राहत्या ठिकाणी विकतात. या ठिकाणी नवरात्रीतील कपड्यांचेही विविध पर्याय पाहायला मिळतील. याशिवाय ज्वेलरी सेटसह मेकअप किट आणि ब्यूटी प्रोडक्ट्स खरेदी करता येऊ शकतात. याठिकाणी तुम्हाला ट्रेंडी घागऱ्यासाठी फॅब्रिक आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये पाहायला मिळतात.

ठिकाण : मंगलदास मार्केट, 66 कांतीलाल एम. शर्मा स्ट्रीट, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबई.

रेल्वेस्टेशन - मरीन लाईन्स.

वेळ : सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत, रविवारी बहुतेक दुकाने बंद असतात.

नटराज मार्केट

तुम्हाला नवरात्रीनिमित्त पारंपरिक गुजराती आणि राजस्थानी कपडे, साड्यांचे विविध ट्रेंड हे मालाडमधील नटराज मार्केटमध्येही पाहायला मिळतील. या नवरात्रीच्या काळात अनेक महिला फॅन्सी आउटफिट्ससाठी नटराज मार्केटमध्ये गर्दी करतात. येथे घागरा-चोळीच्या फॅब्रिकपासून ते शिवलेल्या ट्रेंडी ब्लाऊज आणि फॅन्सी घागरापर्यंत विविध गोष्टी खरेदी करता येतात. शिवाय तुम्हाला ज्वेलरीसाठी विविध दुकानं उपलब्ध आहेत.

ठिकाण : स्वामी विवेकानंद रोड, विजयकर वाडी इंडस्ट्रीयल, विजयकर वाडी, मालाड पश्चिम, मुंबई.

रेल्वेस्टेशन - मालाड

वेळ : सकाळी 11 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत, गुरुवारी बंद असते.

भुलेश्वर मार्केट

अगदी स्वस्तात आणि मस्त ट्रेंडी घागरा-चोळी खरेदी करायची असेल तर भुलेश्वर मार्केट हे खूपच बेस्ट ठरेल. या ठिकाणी विशिष्ट पॅचवर्क, आरसे, कवड्यांनी सजलेल्या ट्रेंडी घागरा- चोळीचे पॅटर्न बघायला मिळतील. याशिवाय विविध प्रकारची ज्वेलरी खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केट उपलब्ध आहेत.

ठिकाण : भुलेश्वर मार्केट, बीएमसी मार्केट, मरीन लाईन्स ईस्ट, पांजरापोळ, भुलेश्वर, मुंबई.

रेल्वेस्टेशन - चर्नीरोड

वेळ : सकाळी 10 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत, सर्व दिवस चालू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT