Manasvi Choudhary
शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस हे शुभ आणि पवित्र मानले जातात.
नवरात्रीचे नऊ दिवसात कोणतेही कार्य केल्यास शुभ मानले जाते.
विशेष म्हणजे नवरात्रीच्या दिवसात घरात रोपटे लावणे शुभ असते. जीवनातील अडचणी दूर होतात.
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. तसेच तुळशीचे रोप लावल्यास देवी लक्ष्मीची कृपाही कायम राहते. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
नवरात्रीत केळीचे रोप लावणे शुभ मानले जाते. दर गुरूवारी पाण्यात दूध मिसळून या रोपाला अर्पण केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते
शंखपृष्पी ही औषधी वनस्पती आहे. नवरात्रीमध्ये शंखपुष्पीचे रोप लावल्यास शुभ मानले जाते. चांदीच्या डब्यात हे रोप ठेवल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
.
नवरात्रीच्या काळात प्राजक्ताचे झाड लावणे फायद्याचे मानले जाते. घराच्या आवारात प्राजक्ताचे झाड लावल्यास आर्थिक चणचण भासत नाही