Renewable Energy | राष्ट्रीय अक्षय उर्जा दिन, अक्षय उर्जा म्हणजे काय? जाणून घ्या Saam Tv News
लाईफस्टाईल

Renewable Energy | राष्ट्रीय अक्षय उर्जा दिन, अक्षय उर्जा म्हणजे काय? जाणून घ्या

कधीही न संपणाऱ्या उर्जेला अक्षय उर्जा म्हणतात. थोडक्यात ज्या उर्जा स्त्रोतांमधून उर्जा ही अमर्यादीत स्वरुपात तयार होत राहते, ती कधीही संपत नाही, ज्याचा क्षय होत नाही त्या उर्जेला अक्षय उर्जा म्हणतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेत असताना विज्ञानाच्या तासाला आपण कुतुहलाने बसायचो. उर्जा म्हणजे काय? उर्जेचे प्रकार कोणते? पारंपारिक उर्जा स्त्रोत? कोणते अपारंपारिक उर्जा स्त्रोत कोणते? हे सर्वकाही आपण शाळेत शिकलोय. आपल्याला माहितच आहे की, पृथ्वीवरील इंधन, खनिजे, नैसर्गिक उर्जास्त्रोत कालांतराने संपणार आहे. त्यामुळे अशा संसाधनांचा वापर कमी करुन कधीही न संपणाऱ्या उर्जास्त्रोतांच्या वापराकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. ''अक्षय उर्जा'' हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. आता अक्षय उर्जा म्हणजे काय? तर कधीही न संपणाऱ्या उर्जेला अक्षय उर्जा म्हणतात. थोडक्यात ज्या उर्जा स्त्रोतांमधून उर्जा ही अमर्यादीत स्वरुपात तयार होत राहते, ती कधीही संपत नाही, ज्याचा क्षय होत नाही त्या उर्जेला अक्षय उर्जा म्हणतात.

हे देखील पहा -

पृथ्वीच्या कुशीत असलेले इंधन जसे, कच्चे तेल, दगडी कोळसा, समुद्रातील ज्वलनशील वायू ही सर्व संसधने आपल्याला निसर्गातून मिळतात. या संसाधनांद्वारे आपण आपली उर्जेची गरज पुर्ण करतो. पण ही सगळी संसाधने ही मर्यादीत आहेत. कधी ना कधी या नैसर्गिक संसाधनांचा साठा संपणार आहे. शिवाय या संसाधनांच्या वापरामुळे प्रदुषणही होते. त्यामुळे ही संसाधने पर्यावरणपुरक नाही. मग अशी कोणती उर्जास्त्रोत आहेत जी अमर्यादीत आहेत आणि पर्यावरणाला पुरक देखील आहे? याचं उत्तर आहे अक्षय उर्जा!

सुर्यप्रकाश, वारा, पाणी हे अक्षय उर्जेचे मुख्य स्त्रोत आहेत. सुर्यप्रकाशाद्वारे सौर उर्जा मिळते, वाऱ्यामुळे पवन उर्जा मिळते तर पाण्यामुळे जल विद्युत केंद्र उभारता येतात. शिवाय या संसधनांनुळे प्रदुषणही होत नाही. त्यामुळे त्यांना ग्रीन एनर्जी म्हणजेज हरित उर्जा देखील म्हटले जाते. पाश्चात्य देशांमध्ये अशा अक्षय उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

२० ऑगस्ट २००४ रोजी झालेल्या पहिल्या ऊर्जा दिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने एक विशेष तिकीटही प्रसिद्ध केले होते.

भारतातही अक्षय उर्जेचा प्रसार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी भारत सरकारने २० ऑगस्ट २००४ पासून राष्ट्रीय अक्षय उर्जा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आहे. अक्षय उर्जा वापरण्यास लोकांना प्रोत्साहित करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वाढदिवशी हा राष्ट्रीय अक्षय उर्जा दिवस साजरा केला जातो. २० ऑगस्ट २००४ रोजी झालेल्या पहिल्या ऊर्जा दिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने एक विशेष तिकीटही प्रसिद्ध केले होते.

पृथ्वाचे वाढते तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी, हिमनगांचा ऱ्हास, ओझोन आवरणाची होणारी हानी अशी अनेक गोष्टींना कारणीभूत आहे ते म्हणजे पारंपारिक उर्जास्त्रोतांचा अतिरेकी वापर. त्यामुळे ही सर्व संकटे टाळण्यासाठी पारंपारिक उर्जेचा वापर कमी करुन अक्षय उर्जेचा वापर करणे हेच मानवच्या, सर्व सजीवांच्या आणि पृथ्वीच्या हिताचे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT