National Mango Day 2024  SAAM TV
लाईफस्टाईल

National Mango Day 2024 : पावसाळ्यात चेहरा होईल मलईसारखा मुलायम; घरी करा मँगो फेशियल

Mango Facial For Healthy Skin : राष्ट्रीय आंबा दिवसानिमित्त त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी घरी मॅगो फेसपॅक तयार करा. आंब्यातील पोषक तत्वे त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.

Shreya Maskar

संपूर्ण भारतात आज 22 जुलै रोजी राष्ट्रीय आंबा दिवस साजरा केला जातो. आंबा हा फळांचा राजा आहे. चवदार आणि रसाळ आंबा आरोग्यासोबत त्वचेसाठी देखील गुणकारी आहे.

पावसात चेहऱ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्यांचे प्रमाण वाढते. अशावेळी चेहऱ्याची चमक कायम टिकवण्यासाठी मॅगो फेशियल करा.

मॅगो फेशियल

साहित्य

कृती

आंब्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम आंब्याचा रस काढून घ्या. त्यात दही आणि मुलतानी माती एकत्र करा. थोडे गुलाबपाणी टाकून याची चांगली पेस्ट करून घ्या. हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे लावून ठेवा. फेसपॅक सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फ चोळा आणि चेहऱ्याला मॉश्चराइज करा. आंब्यामधील अँटीऑक्सिडंट गुणर्धम चेहऱ्याची त्वचा मुलायम करण्यास मदत करतात. मुलतानी माती आणि गुलाबपाणी चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण काढून टाकते.

आंब्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तसेच आंब्यापासून विविध स्वादिष्ट पदार्थ देखील बनवता येतात.आपण आंबा खातो, पण त्याची सालं मात्र टाकून देतो. पण आंब्याच्या सालीपासून देखील स्वादिष्ट पदार्थ बनवता येतो.

आंब्याच्या सालीचे वेफर्स

साहित्य

  • आंब्यांच्या साली

  • काळे मीठ

  • लाल तिखट मसाला

  • काळीमिरी पूड

  • तेल

कृती

पावसाळ्यात आंब्याच्या सालीपासून वेफर्स बनवायचे असल्यास सर्वप्रथम आंब्याची सालं काढून वाळवून घ्यावी. यासाठी तुम्ही पंखा वापरू शकता. तसेच उन्हात वाळवा. आंब्याची सालं वाळण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागतील. आंब्याची सालं वाळवताना त्यावर थोडे मीठ शिंपडा. आंब्याची सालीमधील पाण्याचा अंश संपूर्ण निघून गेल्यावर एका भांड्यात काळे मीठ, लाल तिखट मसाला, काळीमिरी पूड घालून सर्व छान एकत्र करून घ्यावे. आता वाळलेल्या आंब्याची सालं तेलामध्ये खरपूस तळून घ्या. त्यानंतर एका डिशमध्ये तळलेले आंब्याच्या साली काढून त्यावर तयार केलेला मसाला भुरभुरवून घ्या. अशाप्रकारे चटपटीत आंब्याच्या सालीपासून वेफर्स तयार झाले. तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

Maharashtra Live News Update: DRI मुंबईची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 1.718 किलो कोकेन जप्त

Vinod Tawde Bihar Role: बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा, एनडीएच्या विजयाचे शिल्पकार तावडे?

बिहारमध्येही लाडकीचा डंका, बिहारची लाडकी गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT