Nashik Cyber News Saam tv
लाईफस्टाईल

Nashik Cyber News: क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान.. स्मार्टफोन हॅक होण्याची भीती

क्यूआर कोड स्कॅन करताय तर सावधान.. स्मार्टफोन हॅक होण्याची भीती

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : देशात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यूपीआयवर आधारित पैसे देण्याची ही पद्धत लोकप्रिय ठरली. त्यामुळे साहजिकच (Cyber Crime) सायबर भामटेदेखील याकडे वळले आहेत. बनावट (QR Code) क्यूआर कोड लावून लोकांचे फसवणुकीचे गुन्हे वाढले आहे. यात जगामध्‍ये भारत दोन नंबरवर आहे. (Breaking Marathi News)

रेस्टॉरंट, कॅफे इत्यादी ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून मेन्यू तुमच्या समोर येतो. पैसे देण्यासाठीही क्यूआर कोड असतो. मात्र, त्‍याऐवजी स्कैमर्स खोटा कोड लावतात. तो स्कॅन केल्यावर युझर्स ऑनलाइन मेन्यू किंवा पेमेंट चेकआउटवर नेण्याऐवजी फोनमध्ये मालवेअर टाकले जाते आणि त्यातून वैयक्तिक माहिती चोरली जाते. कोरोना काळात भारतात क्यूआर कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे क्यूआर कोड चा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

वैयक्तिक माहितीही होतेय हॅक

भारतासह अनेक देशांमध्ये हा धोका वाढला आहे. कोड स्कॅन करताना वेब युआरएल (Smartphone) स्मार्टफोन हॅक करण्याचे प्रमाण तपासून घ्या. एखाद्या कोडला कव्हर केलेल्या स्टीकरसारखा वाटल्यास स्कैन करू नका. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिक लिंक ओपन करण्याचे सेटिंग बंद करा. स्कैमर्स खऱ्या क्यूआर कोडऐवजी खोटा कोड चिकटवतात. त्यातून फोन हॅक केला जातो. सर्व माहिती हॅकर्सला मिळते आणि काही क्षणांत खाते रिकामे होते. एवढेच नव्हेतर, तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेलदेखील केले जाते. खोटे क्यूआर कोड क्रिप्टोकरन्सी उद्योगातही आहेत. क्रिप्टोमध्ये क्यूआर कोडद्वारे देवाणघेवाण होते. त्यामुळे स्कॅमर्सकडून हे क्षेत्र टार्गेट केले जाते. अज्ञात लोकांकडून मिळालेले क्यूआर कोड स्कॅन करू नका.

भारत दुसऱ्या क्रमांकावर

भारत, अमेरिकेसोबतच जपान, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशांमध्ये क्यूआर कोड स्कॅमचा धोका वाढला. भारतीयांचे सरासरी १५ ते २० हजारांचे नुकसान होते. अमेरिका (४२.२ टक्‍के), भारत (१६.१ टक्‍के), फ्रान्स व ब्रिटन (६.४ टक्‍के), कॅनडा (३.६ टक्‍के) इतके प्रमाण वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Rohit Pawar : दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मातोश्रीत भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; नरकासुराचा वध करण्यासाठी आला-उद्धव ठाकरे|VIDEO

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Boss Gifts Car: बॉस नाही भगवान! कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्टमध्ये दिल्या महागड्या कार; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT