Manasvi Choudhary
रात्रीचे जेवणाचा आरोग्यावर आणि झोपेवर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार रात्री खाण्यापिण्याच्या योग्य सवयी पाळा
रात्री पचनसंस्था मंदावलेली असते अशावेळी काही पदार्थाचे सेवन केल्यास अपचन, अॅसिडी आणि झोपेवर परिणाम होतो.
मसालेदार पदार्थांमुळे पोटात जळजळ आणि ॲसिडिटी होऊ शकते यामुळे रात्री जास्त तिखट पदार्थ खाणे टाळा
आयुर्वेदानुसार, रात्री दही खाणे टाळावे. दह्यामुळे शरीरात 'कफ' वाढतो, ज्यामुळे सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
पिझ्झा, बर्गर, वडापाव किंवा जास्त तेलकट पदार्थ पचायला जड असतात. रात्रीच्या वेळी पचनशक्ती कमी असल्याने हे पदार्थ खाणे टाळा.
रात्री मिठाई, चॉकलेट किंवा आईस्क्रीम खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे शांत झोप येत नाही.
राजमा, छोले किंवा हरभरा यांसारखी कडधान्ये पचायला वेळ घेतात. यामुळे रात्री गॅस आणि पोट फुगल्यासारखे वाटू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.