Daund Bazar Committee: दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा; राष्‍ट्रवादीची सत्‍ता गेली

दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा; राष्‍ट्रवादीची सत्‍ता गेली
Daund Bazar Committee
Daund Bazar CommitteeSaam tv
Published On

प्रफुल्ल भंडारी

दौंड : १९५९ मध्ये स्थापन झालेल्या दौंड बाजार समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) वर्चस्व कमी होऊन पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. (Daund) दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी (BJP) भाजप समर्थक गणेश जगदाळे (लिंगाळी) व उपसभापतिपदी शरद कोळपे (दहिटणे) यांची निवड झाली. निवडीनंतर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. (Maharashtra News)

Daund Bazar Committee
Beed News: संतापजनक..परळीत मृतदेहाची अवहेलना; रेल्वे क्रॉसिंगवर आढळलेला मृतदेह नेला कचऱ्याच्‍या घंटागाडीत

एप्रिल २०२३ मध्ये १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने ९ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान मे महिन्यात व्यापारी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनेलमधून निवडून आलेले संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन झाले. त्यानंतर जनसेवा पॅनेलचे ९ व शेतकरी विकास पॅनेलचे ८ असे संख्याबळ झाले.

Daund Bazar Committee
Kalyan News: एकाच गावात २०० वीजचोर; खोणी ग्रामपंचायत कार्यालयाचाही समावेश

दौंड बाजार समिती सभागृहात (Bajar Samiti) आज दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. प्राधिकृत अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांच्या देखरेखीत ही निवडणूक झाली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी काम पाहिले. सभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे गणेश जगदाळे व शेतकरी विकास पॅनेलचे बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गणेश जगदाळे यांना ९ तर बाळासाहेब शिंदे यांना ८ मते पडली. तर उपसभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे शरद कोळपे व शेतकरी विकास पॅनेलच्या वर्षा मोरे यांच्यात लढत झाली. शरद कोळपे यांना ९ तर वर्षा मोरे यांना ८ मते पडली. मतमोजणीनंतर हर्षित तावरे यांनी सभापतिपदावर गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com