Nag Panchami 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Nag Panchami 2023: नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करु नका 'या' गोष्टी, जाणून घ्या एका क्लिकवर

Nag Pancami Special: उद्या म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.

Priya More

Nagpanchami 2023 Importance: नागपंचमी सणाला (Nag Panchami 2023) हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. यावर्षी नागपंचमीचा सण पाचव्या श्रावणी सोमवारी (Shravani Somvar) आला आहे. उद्या म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.

नागपंचमीच्या दिवशी नाग देवतची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख-शातीं नांदते असे म्हटले जाते. यादिवशी उपवास केला जातो आणि महिला वारुळाला जाऊन पुजतात. महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी जिवंत नागाची देखील पूजा केली जाते. बरेच जण नागपंचमीच्या दिवशी घरामध्येच नागाची मूर्ती अथवा प्रतिमेची पूजा करतात.

नागपंचमीच्या दिवशी काय करावे -

- नागपंचमीच्या दिवशी तुम्ही उपवास ठेवू शकता. या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही असे सांगितले जाते.

– नागपंचमीच्या दिवशी नाग देवतांना दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.

– ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी व्रत ठेवावे.

– नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी मंत्राचा जप करा.

- नागपंचमीच्या दिवशी गरजूंना दान करणं शुभ मानले जाते.

नागपंचमीच्या दिवशी काय करू नये -

- नागपंचमीच्या दिवशी अजिबात माती उखरु नये, शेतात नांगर चालवू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.

- नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका. त्याचसोबत लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.

- नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.

- नागपंचमीच्या दिवशी शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नये. म्हणजेच यादिवशी सुईचा वापर करु नये. असे करणे अशुभ मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

Mahad Tourism : पावसाळ्यात करा महाडची सफर, 'हे' आहेत ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT