
Gold Rate In This Week : सलग चौथ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली आहे. जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात वाढ झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 58,405 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा (Gold) दर 58,891 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. गेल्या महिन्यापासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहे. जुलैमध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला होता. पण नंतर भाव घसरायला लागले आणि आता ते 59,000 रुपयांच्या खाली आले आहेत.
या आठवड्यात सोन्याचा भाव असाच होता
IBJA दरांनुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 58,874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी बाजारपेठ बंद होती. बुधवारी सोन्याचा भाव 58,843 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गुरुवारी सोन्याचा भाव 58,876 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. शुक्रवारी सोन्याचा भाव 58,405 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. संपूर्ण आठवडाभरात सोन्याच्या दरात घसरण झाली.
सोने किती स्वस्त झाले?
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव (Rate) 58,891 रुपयांवर बंद झाला होता. अशाप्रकारे या आठवड्या सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 438 रुपयांनी स्वस्त झाला आहे. या आठवड्यात सोमवारी सोने 58,874 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वात महाग दराने विकले गेले आणि शुक्रवारी सर्वात स्वस्त 58,405 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले.
24 कॅरेट सोन्याची किंमत
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 18 ऑगस्ट 2023 रोजी 24 कॅरेट सोन्याचा कमाल दर 58,471 रुपये होता. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,237 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत.
सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जेस (Charges) भरावे लागतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती देतात.
त्यामुळे भावात घसरण झाली
रेटिंग एजन्सी फिचने यूएस क्रेडिट रेटिंग AAA वरून AA+ वर आणल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती मंद झाल्या आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत घट झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.