ragi cutlet recipe google
लाईफस्टाईल

Nachni Cutlet Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट, घरच्या घरी करा हेल्दी नाचणी कटलेट

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नाचणी कटलेट हा हेल्दी आणि चविष्ट पर्याय आहे. कमी वेळात तयार होणारा हा कुरकुरीत नाश्ता कॅल्शियम आणि फायबरने भरपूर असून आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

Sakshi Sunil Jadhav

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत आणि हेल्दी पदार्थ खायचा असेल तर एक सोपी रेसिपी आहे. तुम्ही हा पदार्थ गरमागरम चहासोबत सुद्धा खाऊ शकतो. या सोप्या रेसिपीचं नाव नाचणीचे कटलेट आहे. ही रेसिपी तुम्ही कमीत कमी वेळात आणि कमी तेलात सुद्धा बनवू शकता.

मुळात नाचणी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यामध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर आणि पोषक घटक असतात. त्यामुळे नाचणीचे कटलेट फक्त चविष्टच नाही तर शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये भाज्यांचा वापर केल्यामुळे त्याची पौष्टिकता आणखी वाढते.

नाचणी कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, पत्तागोभी आणि उकडलेले बटाटे एकत्र मिसळून घ्यावेत. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर यात नाचणीचं पीठ घालून मऊसर पीठ तयार करा. या तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून त्यांना कटलेट किंवा टिक्कीचा आकार द्या.

यानंतर कढईत किंवा तव्यावर थोडं तेल गरम करून हे कटलेट मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कटलेट छान तांबूस झाले की ते बाहेर काढून गरमागरम चहासोबत सर्व्ह करावेत. हा सोपा आणि झटपट तयार होणारा नाचणी कटलेटचा नाश्ता चवीलाच नाही तर आरोग्यालाही फायदेशीर आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरीच हा हेल्दी पर्याय नक्की ट्राय करा.

Anu Meena Death Case: मुलांसमोर मारझोड, बायकोच्या तोंडावर थुंकायचा; CCTV व्हिडिओतून समोर आला अभियंता नवऱ्याचा राक्षसी चेहरा

Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कांद्याला कवडीमोल भाव; नाशिकमधील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या वाचा २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर

SCROLL FOR NEXT