Nachni Vadi: हेल्दी आणि पौष्टीक गोड पदार्थ हवाय? मग नाचणीच्या वड्यांची वाचा रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

नाचणीच्या वड्यांची रेसिपी

नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. तसेच उन्हाळ्यात नाचणी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.

nachni vadi recipe

सोपी रेसिपी वाचा

नाचणी वडी हा एक हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स आहे. जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. वाचा सोपी रेसिपी.

ragi sweet recipe

साहित्य

1 कप नाचणी पीठ, दीड कप गूळ, अर्धा कप पाणी, 2 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड, 2 चमचे सुका मेवा इ.

ragi sweet recipe

स्टेप १

सर्वप्रथम कढईत पाणी गरम करून त्यात गूळ घाला आणि पूर्ण विरघळू द्या. गुळाचे पाणी गाळून घ्या. त्याने घाण राहणार नाही.

healthy indian sweets

स्टेप २

आता कढईत हे गुळाचे पाणी पुन्हा गरम करा. त्यात हळूहळू नाचणी पीठ घालत सतत ढवळत राहा, गाठी होऊ देऊ नका.

ragi benefits

स्टेप ३

मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. त्यात तूप आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा.

ragi benefits

स्टेप ४

शेवटी सुका मेवा घालून मिश्रण एकसारखे करा. तुपाने लावलेल्या ताटात हे मिश्रण पसरवा आणि वरून सपाट करा.

tasty healthy sweets

स्टेप ५

थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड आकारात काप करा आणि वड्यांचा आस्वाद घ्या.

tasty healthy sweets

NEXT: Constipation: सकाळी 1 मिनिटांत पोट होईल साफ, फक्त फॉलो करा ही सोपी पद्धत

constipation remedies
येथे क्लिक करा