Sakshi Sunil Jadhav
आजकाल अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. सकाळी पोट जर नीट साफ झालं नाही, तर दिवसभर अस्वस्थता, गॅस, अॅसिडिटी आणि चिडचिड वाढते. एक सोपी पद्धत तुम्हाला या समस्येपासून सोडू शकते.
पोट पूर्णपणे साफ झाले नाही तर शरीरात घाण टॉक्सिन्स साचून त्वचेवर पुरळ, सुस्ती आणि चिडचिड या समस्या वाढत असतात.
पोट साफ झालं नसेल तर कोणत्याही कामात मन लागत नाही आणि दिवस खराब होतो.
काही लोक तासन्-तास टॉयलेटमध्ये बसूनही त्यांचे पोट साफ होत नाही. त्यासाठी काही उपाय दिले आहेत.
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मलासनात बसा. ही स्थिती पोट साफ होण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
मलासनात बसून एक ग्लास कोमट पाणी हळूहळू प्या. त्याने आतड्यांची हालचाल वाढते. या आसनामुळे मल खाली सरकण्यास मदत होते आणि पोट साफ होण्यास सोपे जाते.
पाणी प्यायल्यानंतर लगेच त्रेयक ताडासन करा. यामुळे शरीरात हालचाल वाढते. दररोज हे उपाय केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळून पोट साफ राहतं.
ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.