Anu Meena Death Case: मुलांसमोर मारझोड, बायकोच्या तोंडावर थुंकायचा; CCTV व्हिडिओतून समोर आला अभियंता नवऱ्याचा राक्षसी चेहरा

Rajasthan Anu Meena Death Case : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये, अभियंता असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून एक विवाहितेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी इंजिनिअरचा संताजनक कृत्य सीसीटीव्हीत कैद झालंय.
Rajasthan Anu Meena Death Case :
ANU MEENA DEATH CASE: CCTV EXPOSES SHOCKING ABUSE BY ENGINEER HUSBANDsaam tv
Published On
Summary
  • जयपूरमध्ये अनु मीना नावाच्या महिलेची आत्महत्या.

  • अभियंता पतीवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचे आरोप.

  • सीसीटीव्ही व्हिडिओमधून समोर आले धक्कादायक दृश्य.

मध्य प्रदेशातील ट्विशा शर्मा यांच्या मृत्यूचे प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणा डोक्यातून जात नाही तोच राजस्थानची राजधानी जयपूरमधून तशीच एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकर समोर आला आहे. येथे अनु मीना नावाच्या एका विवाहित महिलेने नवऱ्याच्या छळला कंटाळून जीवनं संपवलंय.

Rajasthan Anu Meena Death Case :
आईने आधी 3 वर्षाच्या लेकराला संपवले, नंतर स्वतः ही केली आत्महत्या; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल

हुंड्यासाठी कार्यकारी अभियंता पती पत्नीला मारझोड करायचा. तिच्या तोंडावरच थुंकायचा असा संतापजनक प्रकार सीसीटीव्ही व्हिडिओतून समोर आलेत. दरम्यान याप्रकरणी सुमारे ४० दिवसांनंतर अनुच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीसह इतर अनेकांविरुद्ध नावे नमूद करून एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर अुन मीनाच्या नवऱ्याचा राक्षसीचा चेहरा समोर आला.

Rajasthan Anu Meena Death Case :
Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

अनु मीना या देखील एक इंजिनिअर होत्या. हुंड्यासाठी त्यांचा नवरा त्यांच्याशी कशाप्रकारे छळ करायचा हे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये, तिचा इंजिनिअर नवरा मुलांसमोरच तिला बुटाने मारहाण करताना आणि तिच्या चेहऱ्यावर थुंकताना दिसत आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पती आणि इतर जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अनु मीना यांची मुले आता आपल्या वडिलांच्या क्रूरता सांगताना ढसाढसा रडतात.

लग्नापासून सतत हुंड्याची मागणी

जयपूरमधील गोपालपुरा बायपास येथे राहणारे निवृत्त हेड कॉन्स्टेबल रोहिताश मीना यांनी सुमारे ११ वर्षांपूर्वी, २५ जुलै २०१५ रोजी, आपली मुलगी अनु मीना हिचे लग्न लोककल्याण विभागातील अभियंता गौतम मीना यांच्याशी लावून दिले होते. रोहिताश मीना यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर अंदाजे ६० लाख रुपये खर्च केले होते. हुंडा म्हणून पाच लाख रुपयांसोबत एक होंडा सिटी कार दिली होती.

इंजिनिअर गौतम मीनाने लग्नानंतर लगेचच हुंड्याच्या मागणीसाठी अनुचा छळ करण्यास सुरुवात केली. तो दारूच्या नशेत तिला वारंवार मारहाण करायचा. अनुने ८ जुलै २०१६ रोजी माहिर नावाच्या मुलाला आणि २१ जानेवारी २०१८ रोजी समायरा नावाच्या मुलीला जन्म दिला.

हुंड्यासाठी मारहाण

अनु मीनाच्या कुटुंबीयांचा आरोप केलाय की, तिचा इंजिनिअर नवरा गौतम तिचा छळ करायचा त्याची तीव्रता वाढली होती , तो जास्त प्रमाणात तिला मारहाण करायचा. त्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, इतकेच नव्हे तर मुलांसमोरही तिला निर्दयपणे मारहाण केली. २०२२ मध्ये अनुच्या कुटुंबीयांनी पुन्हा गौतमला २० लाख रुपये दिले होते, तरीही तो तिला मारहाण करायचा.

नैराश्यातून विवाहितेची आत्महत्या

अनु मीनाने ७ एप्रिल रोजी नवऱ्याच्या घरी आत्महत्या केली. तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येच्या वेळी ती तिच्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी याला पती-पत्नीमधील भांडण आणि रागाच्या भरात घडलेली घटना समजून पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.

आईच्या मृत्यूनंतर अनुची दोन मुले त्यांच्या माहेरच्या घरी राहायला गेली होती. तिचा मोबाईल फोनही तिच्या आईवडिलांच्या ताब्यात होता. आत्महत्येनंतर सुमारे पाच आठवड्यांनी, तिच्या आईवडिलांना तिच्या मोबाईल फोनमध्ये एक सीसीटीव्ही फुटेज सापडले, जे पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com