Raj Bhavan Mumbai Visit 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Raj Bhavan Mumbai Visit 2023: अवघ्या २५ रुपयांत पाहू शकता मुंबईतील राजभवन, कसे कराल बुकिंग?

Raj Bhavan Visit : ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी बुकिंगची आवश्यकता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Online Booking For Mumbai Raj Bhavan Visit

भारत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारताने हा वारसा जपला आहे. हा वारसा कला, साधने, वास्तू या सगळयातून जगाला कळत आहे. हाच वारसा मुंबई शहराला लाभला आहे. मुंबई शहरातील अनेक जुन्या इमारतींना काही न काही इतिहास आहे. या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी बुकिंगची आवश्यकता असते.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात . यातीलच एक ठिकाण म्हणजे राजभवन. राजभवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूला भेट देण्यासाठी बुकींग करावे लागते. हे बुकिंग तुम्ही कसे करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राजभवन ही ब्रिटिंशाच्या काळात बांधली गेलेली वास्तू आहे. राजभवनाला 'ब्रिटिश काळाची आठवण' असे म्हणायला हरकत नाही. राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. राजभवन मुंबईतील मलबार हिल्सच्या टोकावर आहे. हे ५० एकर जंगलात स्थित आहे. राजभवनाला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढले आहे. या मालमत्तेत अनेक हेरिटेज बंगले, विस्तृत लॉन आणि समुद्र किनारा आहे. पूर्वी याला सरकारी हाऊस (Government House)म्हटले जायचे.

ब्रिटिश वसाहतीच्या सरकारने १८८५ मध्ये राजभवन बांधले. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने गेट वे ऑफ इंडिया बांधले आहे. त्याच व्यक्तीने राजभवन बांधले आहे. या इमारतीत भारतीय आणि ब्रिटीश शैलीचे मिश्रण आहे. राजभवनाच्या मध्यभागी मोठा घुमट आणि चार स्तभांचा भव्य मंडप आहे.

राजभवनाला भेट देण्यासाठी प्री बुकिंग आवश्यक

राजभवनाला भेट देण्यासाठी बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंगनुसार, आपल्याला स्लॉट बुक करावे लागतील. बुकिंगशिवाय राजभवनाला भेट देण्यास परवानगी नाही.

  • राजभवनाला भेट देण्यासाठी https://rbvisit.rajbhavan-maharashtra.gov.in/ या वेबसाईवर भेट द्या.

  • वेबसाईटवर साइन-इनवर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकून माहिती भरा.

  • तुमच्या ईमेलवर ओटीपी आला असेल तो तिथे सबमिट करा.

  • त्यानंतर डॅशबोर्डवर जाऊन तुमच्या खात्यात लॉग इन करा.

  • त्यानंतर तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय येईल. तिथे भेट देण्याची तारीख, वेळ आणि किती जागा बुक करायच्या आहेत त्याची माहिती लिहा.

  • त्यानंतर तुमची स्वतः ची माहिती भरा. त्यात नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी तसेच वाहन क्रमांक इत्यादी माहिती भरा.

  • यानंतर तुमचा फोटो आणि ओळखपत्राचे फोटो अपलोड करा.

  • पेमेंटसाठी तुम्ही नेट बँकिग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करु शकता. राजभवनाला भेट देण्यासाठी अंदाचे किंमत २५ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT