Phone Charging Tips: फोन चार्ज करताना तुम्हीती ही चूक करताय? आजच थांबा नाहीतर मोबाईलचा स्फोट होईल

Smartphone Battery Tips: अनेक व्यक्ती फोन चार्जिंग करण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी काहींच्या फोनचा स्पोट देखील होतो.
Phone Charging Tips
Phone Charging TipsSaam TV
Published On

Technology News:

फोनची बॅटरी सतत डाऊन होण्याच्या समस्या अनेकांना जाणवतात. चार्जिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी फॉलो करणे गरजेचं असतं. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपत नाही. मात्र अनेक व्यक्ती फोन चार्जिंग करण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी काहींच्या फोनचा स्पोट देखील होतो. (Latest Marathi News)

Phone Charging Tips
Nokia 5G Phone : आला रे आला., Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर

फोन वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी. त्याला चार्जिंग कधी आणि कशी करावी याबाबत अनेकांना काहीच माहिती देखील नाही. त्यामुळे आज या बातमीमधून फोन चार्ज करण्याच्या काही टिप्स माहीत करून घेऊ.

अनेक तरुण तरुणी दिवसभर कामात व्यस्त असतात. अशात त्यांच्या हातात सतत फोन हवा असतो. त्यामुळे बऱ्याचदा रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावून झोपतात. असे केल्याने फोन रात्रभर तसाच राहतो. ओवर चार्जिंगमुळे फोनची बॅटरी खराब होते.

फोन चार्जिंगला असताना काही महत्वाची कामे असल्यास अनेक जण फोन वापरतात. मात्र चार्जिंग होत असताना फोन वापरणे ही वाईट सवय आहे. जर तुम्हाला महत्वाचे काम असेल तर चार्जिंग बंद करा आणि मग फोन वापरा.

फोनची बॅटरी संपत आल्यावर फोनवर एक लाल रंगाची लाईट दिसते. ही लाईट चार्जिंग संपत आल्याचे नोटिफिकेशन देते. मात्र अनेक जण फोन स्विचऑफ होईपर्यंत वापरतात. असे केल्याने फोनची लाईफ आणि बॅटरी दोन्हीचे आयुष्य कमी होते.

घरी चार्जर विसरण्याची चूक दहापैकी नऊ लोक हमखास करतात. कामाच्या ठिकाणी आल्यावर फोनची चार्जिंग संपल्यास दुसऱ्या व्यक्तीचा चार्जर वापरतात. आपल्या फोनला दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्याने फोन खराब होतो. त्यामुळे चुकूनही दुसऱ्या कंपनीचा चार्जर आपल्या फोनसाठी वापरू नका.

फोन वापरत असताना अनेकदा त्याचे तापमान वाढते. फोन आपल्या हाताना गरम लागू लागतो. अशावेळी फोन वापरणं बंद करावं. जर तुम्ही कॉल वर बोलत असाल तर कॉल कट करावा. अन्यथा ओवरहिट मुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.

या प्रकारच्या टिप्स आणि काळजी घेतल्यानंतर तुमच्या फोनची बॅटरी चांगल्या पद्धतीने चालेल. तसेच चार्जिंग सतत संपण्याच्या समस्याही कमी होतील.

Phone Charging Tips
Jio New Phone : 5G फोन अवघ्या 999 रुपयांत, JIO चा स्वस्तातला फोन कसा खरेदी कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com